जनकल्याण मराठी पत्रकार संघाची शहर व मालेगाव तालुका कार्यकारिणीची घोषणा,
मालेगाव : जनकल्याण मराठी पत्रकार संघाची मालेगाव शहर व तालुका कार्यकारिणी ची बैठक छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत येथिल शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या वेळी प्रमुख पाहुणे जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सतिश खैरनार, पोलीस मित्र समिती चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश पगारे हे होते. या वेळी मालेगाव तालुका अध्यक्ष पदी गर्जना न्युज चे संपादक प्रदिप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तर मालेगाव शहर महानगर अध्यक्ष पदी रयत राज्य चे संपादक विशाल मोरे यांची निवड करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी दै. लोकनामा व बागलाण वृतांत चे विनायक इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली तर नासिक जिल्हा उपाध्यक्ष पदी MH 41 न्युज चे राहुल पवार यांची तर क्राईम डायरी न्युज चे संपादक प्रविण पवार यांची निवड करण्यात आली. तसेच मालेगाव तालुका कार्याध्यक्षपदी विशाल पवार, तालुका उपाध्यक्ष पदी दै लोकनामा चे महेंद्र आहिरे यांची नियुक्ती करण्यात आली तर मालेगाव शहर उपाध्यक्ष पदी बागलाण वृत्तांत न्युज चे विशाल शिवदे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रबंधभुमी चे जायखेडा येथिल विशाल बच्छाव यांची तर जायखेडा विभाग प्रमुख पदी एम जी न्युज चे रेवननाथ लोंढे यांची नियुक्ती करण्यात येवून त्यांना निवड पत्र देण्यात आले.
या वेळी संघटना बळकट करण्यासाठी एकदिलाने काम करुन संघटनेची वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी महानगर प्रमुख विशाल मोरे यांचा वाढदिवस जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात आला.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






