best news portal development company in india

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्ती, शिलालेख भव्य अनावरण.

SHARE:

aonenewsmaharashtra@gmail.com
नाशिकः 

     होळकर नगरी चांदवड नाशिक ते इंदोर राजधानी महेश्वर शाली वाहन मंदिर नर्मदे तिरी मातोश्री यांच्या मूर्तीची अनावरण.. 

   नाशिक:- चांदवड त्रिशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक असे वेगवेगळे भारतभरातून उपक्रम राबवले जात आहे. याच धरतीवरती नाशिक जिल्ह्यातून होळकर नगरी चांदवड येथून एक आगळावेगळा उपक्रम राबवला जात आहे. 300 जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर तीनशे मूर्ती वाटप करण्याचे ध्येय होणारे होळकर शाईची अभ्यासक व जागृती करणारे श्री समाधान बागल यांनी सुरु केले. आहे.आतापर्यंत 211 मूर्ती स्व: खर्चातून वाटप केल्या आहे. स्वखर्चातून मूर्ती चे वाटप करण्याचे ध्येय घेऊन हा तरुण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. आणि मातोश्रींच्या कर्मभूमीत शालीवाहन मंदिर येथे पहिली मूर्ती स्थापन झाली.आणि संपूर्ण महाराष्ट्रात आगळावेगळा इतिहास निर्माण केला. मातोश्री ची पहिली मूर्ती चांदवड येथे अज्ञात व्यक्तींनी बसवली असता ती प्रशासनाने काही कारणास्तव उठवली गेली. परंतु प्रशासनाकडे मागणी केली असता श्री समाधान बागल व स्वप्निल राजे होळकर यांनी पत्रव्यवहार करून ही मूर्तीचे संवर्धन स्थापन करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली.चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ साहेब यांनी मदत केली.व ही मूर्ती समाधान बागल यांना स्वाधीन केली.
      मूर्तीची संवर्धन करण्यासाठी रविवार दिनांक 23/2/2025 रोजी ही मूर्ती इंदोर उज्जैन महेश्वर कडे प्रस्थान झाली. सुरुवातीला उज्जैन येथे जाऊनशिप्रा नदीकाठीच्या मूर्तीची पूजन करून महाकालेश्वराचे दर्शन घेतले. तसेच ही मूर्ती इंदोर येथे जाऊन मल्हारी मार्तंड च्या मंदिराच्या परिसरात भाविकांनी दर्शन घेतले. इंदूरच्या राजवाड्यात दर्शन घेतले. 24 तारखेला संध्याकाळी महेश्वर नर्मदा तीरी शालनी वाहिनी मंदिर या ठिकाणी मूर्ती पोहोच झाली.25 तारखेला सायंकाळी चार वाजता ही मूर्ती मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला,तसेच शिलालेख अनावरण सोहळा मोठा कार्यक्रम पार पडला, प्रिन्स रिचर्ड शिवाजीराव होळकर महाराज यांचा भव्य असा फुलांच्या वर्षाव करून स्वागत करण्यात आले.यांच्या हातून मातोश्रींच्या मूर्तीची पुष्पहार घालून,शालि वाहन मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली. महाराजांच्या हातून शिलालेखाचे अनावरण  करण्यात आले.    या सोहळ्यास प्रमुख संयोजक स्वप्निल राजे होळकर (पंच भैया कमिटी ) यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रास्ताविक स्वप्निल राजे होळकर यांनी केले तीन हजार वर्षांपूर्वीचे शालि वाहन राजा मंदिर ची स्थापना केली होती.1908 मध्ये या मंदिराची जीर्णोद्धर स्वप्निल राजे होळकर यांचे आजोबा बापूजी होळकर यांनी करून पुनश्च एकदा या मंदिराचा इतिहास जागृत केला. शिलालेखाचा नवीन जीर्णोद्धार करण्यात आला. स्वप्निल राजे होळकर यांच्या हस्ते करण्यात आला.  निसर्गरम्य वातावरणातआणि महेश्वरीच्या नर्मदेच्या तीरावरती च्या महेश्वर फोर्टच्या समोर या मातोश्रींच्या मूर्तीचीअनावरण झाले.महाराजा प्रिन्स रिचर्ड शिवाजीराव होळकर यांचा सन्मान महाराष्ट्राच्या वतीने श्री समाधान बागल व भूषण जाधव यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.स्वप्निल राजे होळकर यांच्या वतीने मातोश्री ची प्रतिमा व श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.शेवटी मातोश्रींच्या जीवनावरती एक पात्री नाटक श्री सुनील मतकर यांच्या संयोगाने झाले.
     या सोहळ्यास प्रमुख मान्यवर श्री सुधीरजी देडगे ( पूर्व MIC सदस्य – नगर पालिका निगम इंदोर,)श्री राजेंद्र सिंह यादव – कसरवाद नगर अध्यक्ष, श्री भालू जी मोंढे ( पद्म श्री ),श्री सुनील जी मतकर इंदौर, श्रीमंत अनिलराव होळकर ( राज घराना )श्रीमंत सुभाष राव होळकर (राजघराना )श्रीमंत विवेकराव होळकर ( राजघराना ) श्रीमंत जयप्रकाश राव होळकर (राजघराना ) श्रीमंत ऋषिकेश राव होळकर (राजघराना )श्रीमती शरयू ताई वाघमारे – समाजसेवी इंदोर,श्रीमंत स्वप्ननिल राजे होळकर,श्री समाधान बागल समाजसेवक भूषण जाधव योगेश धरम धनगर भारुड समाज खरगोन जिल्हा अध्यक्ष श्री मोहन जी धनगर, धार जिल्हा अध्यक्ष श्री अजय जी धनगर, खरगोन युवा जिल्हा अध्यक्ष श्री अरुण जी धनगर, ऑल इंडिया धनगर महासंघ प्रदेश अध्यक्ष श्री महादेव जी धनगर, धनगर युवा सेना बड़वानी जिला अध्यक्ष श्री ताराचंद धनगर, श्री दिलीप जी धनगर, श्री राधेश्याम जी धनगर, श्री मोहित जी धनगर, श्री अरविंद जी धनगर श्री ,शेरु जी धनगर, श्री कैलाश जी धनगर, श्री सुखदेव जी धनगर व इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते….
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई