best news portal development company in india

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाचा दणका… दोन वर्षांची सुनावली शिक्षा ,,, 

SHARE:

 

नाशिकः 
aonenewsmaharashtra@gmail.com
पत्रकार:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाचा दणका… दोन वर्षांची सुनावली शिक्षा ,,,
    नाशिकः सन – १९९५ मध्ये दाखल माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कागदपत्रांची फेरफार व फसवणूक केली आहे, अशा प्रकारच्या याचिका दाखल करण्यात आली होती, या प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू सुनील कोकाटे यांना सुद्धा दोषी ठरवण्यात आले आहे. तब्बल पंचवीस वर्षे चाललेल्या या संदर्भात याचिकाकर्ते सिन्नर तालुक्यातील माजी आमदार व मंत्री तुकाराम दिघोळे यांचे मागील काही वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांच्या या लढ्याला यश मिळाले आहे व न्याय हक्कासाठी लढा देणारे कै.दिघोळे हे सध्या आपल्यात नाहीत हे दुर्दैव.. नुकत्याच झालेल्या नाशिक कोर्टात सुनावणी दरम्यान वरील निर्णय देण्यात आला असल्याची खात्रीलायक वृत्त आहे, त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी व मंत्री पदावर गदा आली तर… कारण न्यायालयाने सदर निर्णय कायम ठेवला तर आमदारकी सह कृषी मंत्री पदावर टांगती तलवार कायम राहील असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे…
  दरम्यान सदर निर्णय हा स्थानिक जिल्हा न्यायालयाचा आहे त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते.परंतु कोकाटे यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे… परंतु न्यायालयाने श्री, कोकाटे यांना दोषी ठरवल्यानंतर नाशिक जिल्हा सह सिन्नर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे….
 माणिकराव कोकाटे व भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार अशी ही शिक्षा आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल होता 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी त्यांच्यावर आरोप होते माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनीही याचिका दाखल केली होती भारतीय दंड विधान 420, 465 ,471 आणि 47  अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता,

जाहिराती व बातमीसाठी संपर्क: 9422952513
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई