– ज्ञानेश्वर सांगळे,नाशिक
येवला:-येवला तालुक्यातील डोंगरगाव येथील शासकीय जमीन गट नं. 13 वर अतिक्रमण करुन बेकायदेशीर रित्या दुकाने बांधून व्यवसाय करणाऱ्या येथील सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करुन त्यांना पुढील 6 वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करावे अशी मागणी करणारी याचिका जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे. डोंगरगाव येथील ग्रामस्थ कैलास सोमासे, साहेबराव सोमासे व अशोक पगारे यांनी वकील श्री एकनाथ ढोकळे यांच्या मार्फत सदर याचिका दाखल केली आहे.
याचिकेत असे म्हटले आहे की डोंगरगाव येथील सरपंच उज्ज्वला रमेश ढोकळे यांनी आपले पती रमेश ढोकळे व सासरे कचरू ढोकळे, उपसरपंच गौतम बाळू पगारे यांनी आपले वडील बाळू पगारे, सदस्य ज्ञानेश्वर केशव सोमवंशी यांनी आपले वडील केशव सोमवंशी व भाऊ योगेश व अनिल सोमवंशी, सदस्य भीमाबाई तात्यासाहेब ढोकळे यांनी आपला मुलगा साईनाथ ढोकळे, सदस्य शारदा मारुती सोमासे यांनी आपले पती मारुती सोमासे यांचेमार्फत वरील जमिनीवर अतिक्रमण करुन बेकायदेशीर बांधकामे करुन त्या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. सदर प्रकार हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४(१) (जे-३) चे उल्लंघन करणारा असल्याने वरील सर्वांना सदस्य पदी राहण्याचा कोणताही हक्क राहिलेला नाही असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आलेला आहे.
याबद्दल बोलतांना वकील श्री एकनाथ ढोकळे यांनी सांगितले की, नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने सदर जमिनीवरील सर्व अतिक्रमणे चार महिन्यांत हटविण्यात यावीत असे आदेश दिलेले आहेत. उच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत ग्रामपंचायत डोंगरगाव यांच्या वतीने ग्रामसेवक यांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते त्यात सदर जमीन ही शासकीय जमीन असल्याचे स्पष्टपणे मान्य केले आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्य हे केवळ लोकप्रतिनिधी नाहीत तर लोकसेवक देखील आहेत. त्यांनीच शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले असल्याने त्यांना सदर पदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही व त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून सदर याचिका दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता असे कळले आहे की, सदर याचिका जिल्हाधिकारी यांनी दाखल करुन घेऊन वरील सर्व अतिक्रमण धारक सदस्यांना व तक्रारदार यांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावली आहे व दि. 20 फेब्रुवारी रोजी आपले म्हणणे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






