10/1/2025 रोजी कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती सटाणा येथील रवींद्र दगा म्हसदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचा समवेत लाच घेताना रंगेहात पकडले. 
प्रतिनिधी नाशिक
जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून बरेच ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही सुरू असून ग्रामसेवकांच्या दोन डझनच्या वरती ला.प्र.वि.नाशिक यांनी कारवाई केली असून चौकशी सुरू आहे.त्यातच 10/1/2025 रोजी कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती सटाणा येथील रवींद्र दगा म्हसदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचा समवेत लाच घेताना रंगेहात पकडले.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई युनिट -ला.प्र.वि. नाशिक.
तक्रारदार- पुरुष, 37 वर्ष, रा. ताहाराबाद, तालुका – बागलाण, जिल्हा – नाशिक
आलोसे- रवींद्र दगा म्हसदे, वय- 48, कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती सटाणा (बागलाण) वर्ग-3, राहणार- न्यू प्लॉट, कचेरी रोड, सटाणा (बागलाण).
सविस्तर वृत्त असे की,-
यातील तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळा येथे प्राथमिक शिक्षक असून त्यांच्या वडिलांच्या आजारासाठी त्यांनी खर्च केलेल्या रक्कमचे बिल तक्रार यांनी वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणे कामी पंचायत समिती, बागलाण येथे दाखल केले होते. सदरील बिलावर गटशिक्षण अधिकारी यांनी स्वाक्षरी झालेली होती. तरीदेखील यातील आरोपी लोकसेवक यांनी सदरील बिल जावक क्रमांक देऊन जिल्हा परिषद, नाशिक कार्यालय येथे पाठवले नव्हते. सदरील वैद्यकीय बिलावर जावक क्रमांक नोंद करून पुढे पाठविण्यासाठी तक्रारदार आरोपी लोकसेवक आलोसे- रवींद्र दगा म्हसदे, वय- 48, कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती सटाणा (बागलाण) वर्ग-3, राहणार- न्यू प्लॉट, कचेरी रोड, सटाणा (बागलाण).यांना भेटले असता. त्यांनी सदरील फाईल वर जावक क्रमांक नोंद करून सदरील फाईल तक्रारदार यांच्याकडे पुढील कार्यवाही करणे मोबदल्यात आलोसे रवींद्र दगा म्हसदे यांनी तक्रारदार यांच्याकडे 10/1/2025 रोजी 500/- रुपये लाचेची मागणी केली, यानंतर सापळा अधिकारी श्री संदीप बबन घुगे पोलीस निरीक्षक लासलुचपत प्रतिबंधक विभाग नासिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सापळा पथक पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, योगेश साळवे ,पोलीस नाईक परशुराम जाधव ला.प्र.वि.नाशिक यांची नेमणूक करून रवींद्र दगा म्हसदे यांना रंग हात पकडण्यात आले. पंच साक्षीदार यांच्या समक्ष मागणी केली लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून आरोपी लोकसेवक यांच्यावर गुन्हा दाखल.
आलोसे यांचे सक्षम प्रधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद, नाशिक.
मार्गदर्शक –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसम याने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक 0253-2578230,टोल फ्री क्रमांक १०६४
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




