त्र्यंबककरांना बसस्थानक उद्घाटनाची प्रतीक्षा, इलेक्ट्रिक बस आत जाण्याला उंचवट्याचा अडथळा…
…
त्र्यंबकेश्वर ( प्रतिनिधी )
गेले सहा सात वर्षांपासुन येथील बसस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम जवळपास पुर्णत्वास आले असुन रंगरंगोटी व किरकोळ कामे अद्याप बाकी आहेत. बसस्थानकाचे काॅंक्रीटकरण रस्त्यापेक्षा एक ते दिड फुट वर केल्याने व निमुळता उतार न करता जागेवरच उतार देण्यात आला आहे. परिवहन महामंडळाच्या सिव्हिल अभियंता भुसारे मॅडम यांनी आज बस प्रवेश करतांना पाहणी केली गेली. ट्रायल साठी आणलेल्या इलेक्ट्रिकल बसचा पुढचा भाग खाली टेकल्याने बस स्थानकात जाऊ शकली नाही.
परिणामी नव्याने केलेले काँक्रीटीकरण फोडुन निमुळता उतार द्यावा लागेल. हे काम करतांना जुने काम व नवीन काम एकजीव होईल का? हे काम किती दिवस टिकेल? असा प्रश्न नागरीक विचारीत आहे. तसेच सामान्य लोकांच्या लक्षात आलेला हा दोष इंजिनिअर अथवा ठेकेदाराच्या लक्षात कसा आला नाही? यावर चर्चा सुरु आहे.
सध्या बसस्थानक श्री गजानन महाराज संस्थान कुंभमेळा बस स्थानकात असुन नागरीकांच्या दृष्टीने ते गैरसोयीचे आहे. येथुन असंख्य स्थानिक नागरीक रोज नाशिकला ये जा करतात. मात्र येथुन घरी जातांना वृध्द नागरीक, विद्यार्थी, नोकरदार, मुले, महीला यांना एकतर दुरवर पायी जावे लागते अथवा अर्ध्या एक किलोमीटर जाण्यासाठी किमान नाशिक त्र्यंबक एस.टी. प्रवासा एवढे रिक्षाभाडे द्यावे लागते. त्यामुळे या बसस्थानकाच्या उद्घाटनाची नागरीकांना प्रतिक्षा आहे. 
प्रतिनिधी:-रविंद्र धारणे, त्र्यंबकेश्वर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




