प्रतिनिधी नाशिक
अहिल्यानगर संगमनेर, आंभोरे येथे मातोश्रीची मूर्ती चे आगमन ..अनोखा उपक्रम…
उत्तर महाराष्ट्राची उपराजधानी चांदवड होळकर नगरी (रंगमहाल )होळकर वाडा बघण्यासाठी केल आव्हान होळकर शाहीच्या इतिहासाला उजाळा.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक छोट्याशा हिरापुर गावचा युवक श्री.समाधान बागल हे सर्वसामांन्य कुटुंबात जन्मलेला…आपले शिक्षण संपवून आज ते एका नामांकीत कृषी कंपनीत नोकरी करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात.परंतु ज्या मातेने संपूर्ण जगात आपले महान लोकभिमुख ,सामाजिक,धार्मिक कार्यात एक महिला म्हणून स्वतंत्र ठसा उमटविला त्या मातेचा प्रत्येकास हेवा वाटावा असे प्रचंड कार्य केले.ज्याप्रमाणे उगवत्या सूर्याला आपल्या तळहाताने झाकू शकत नाही अथवा झाकण्याचा प्रयत्न देखील करु शकत नाही असे कार्य हे या मातेचे!..या मातेने फक्त एक समाजासाठी काम केलेले नसुन तळागाळातील सर्व सामांन्य माणसापर्यंत केलेले आहे मग त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही मग ती महिला आहे का पुरुष,कोणत्याही जातीचा,धर्माचा,वर्ण भेद केला नाही.अशी सर्वधर्म समभावाची शिकवण ज्या मातेने दिली त्या एकमेव राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय…. काही मुठभर लोकांना हे सहन न झाल्याने त्यांचे कार्याचा इतिहास पुसुन टाकण्याचा प्रयत्न केला जात असतांना त्यास छेद देण्याचे एक खुप मोठे काम आज एक युवक मिळ्णा-या स्वत:च्या पैशातून काही पैसे राजमाता पुण्यश्लो अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती बनवून घेउन आज महारष्ट्रात मोफत वितरणाच कार्यक्रम हाती घेतला आहे.त्याचाच भाग म्हणून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 2025 हे नविन वर्ष त्रिशताब्धि वर्ष म्हणून साजरे होत आहे.त्यानिमीत्ताने अहिल्यादेवींच्या विचाराने ध्येय वेडा झालेला चांदवड येथील युवक समाधान बागल यांनी राज्यभर अहिल्यादेवींच्या 300 मुर्ती मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
अहिल्यानगर संगमनेर, आंभोरे येथे मातोश्रीची मूर्ती चे आगमन ..अनोखा उपक्रम…
आजपर्यंत 171 मुर्ती वितरण करण्यात आल्या आहेत.त्यातील एक मुर्ती संगमनेर तालुक्यातील अंभोरे ग्रामपंचायत कार्यालयासाठी रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी आज समाधान बागल यांच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंच सौ.सुरेखा खेमनर,उपसरपंच किसन खेमनर श्री.भाऊसाहेब खेमनर,श्री.संपत गोविंद खेमनर सदस्य ग्रामपंचायत,श्री.भाऊसाहेब रखमा खेमनर यांच्या ताब्यात देण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाधान बागल,शशीकांत कोथंबीरे,श्री.विनायक काळदाते,श्री.शाम गोसावी, अँड गोरक्षनाथ कापकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांचा सत्कार सन्मान पदाधिकारी यांचे शुभ हस्ते करण्यात आला.तसेच या सुंदर उपक्रमाबद्दल समाधान बागल यांचे तोंडभरुन कौतुक करण्यात आले..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.रावसाहेब रावजी खेमनर श्री.विठोबा जानकू खेमनर,श्री.रमेशराव खेमनर, अँड.संदीप जगनर,अँड.गोरक्ष कापकर,श्री.अनिल खेमनर ,श्री.बाबुराव खेमनर ,डॉ.बाबासाहेब खेमनर ,श्री.बापू खेमनर ,श्री.प्रकाश खेमनर ,श्री.श्रावण खेमनर,श्री.पिरसाहेब खेमनर ,नवनाथ खेमनर ,बाबासाहेब रावजी खेमनर,रशिद मनियार,सुनिल खेमनर ,माधव बाचकर,सुंदर खेमनर ,बि.एस.खेमनर ,भाऊसाहेब येसु खेमनर ,मच्छिंद्र फिटर,पांडूरंग खेमनर ,मंगेश जगनर,हौशिराम वाघमोड़े,अजित खेमनर ,संजय खेमनर ,अजित रामदास खेमनर,श्री.वाल्मिक खेमनर,चांगदेव खेमनर आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक,सुत्र संचालन श्री.सुभाषराव ह्ळनोर यांनी केले.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......







