प्रतिनिधी नाशिक:-ज्ञानेश्वर सांगळे
जी.ई.एस. हायस्कूल, शिरसमणी ता.पारोळा जि.जळगाव येथील मुख्याध्यापक जितेंद्र निंबा पाटील यांच्या विरोधात आंदोलन उपाध्यक्ष रतन नारायण पाटील यांचे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर नाशिक येथे आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला वारंवार निवेदन देऊनही याची दखल न घेतल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न…
जी.ई.एस. हायस्कूल, शिरसमणी ता.पारोळा जि.जळगाव येथील मुख्याध्यापक जितेंद्र निंबा पाटील यांनी संस्थेचे व शाळेचे अभिलेख दप्तरात खाडाखोड व शाळेच्या खात्यात आर्थिक गैरव्यवहार व अनागोंदी व्यवहार केल्याबाबत त्यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची व फौजदारी कार्यवाही करणेबाबत तातडीची मागणी…
जी.ई.एस. हायस्कूल, शिरसमणी ता.पारोळा जि.जळगाव येथील मुख्याध्यापक जितेंद्र निंबा पाटील यांनी संस्थेचे व शाळेचे अभिलेख दप्तरात खाडाखोड व शाळेच्या खात्यात आर्थिक गैरव्यवहार व अनागोंदी व्यवहार केल्याबाबत उपाध्यक्ष रतन नारयण पाटील ,दिगंबर म्हारू पाटील ,भगवान राघो पाटील, अजबराव महाजन व इतर असे नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथे उपोषणासाठी बसले होते.वेळोवेळी निवेदन देऊन त्यावर कार्यवाही होत नाही…म्हणून……
मागण्या
(१) दि. २३/०७/२०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी, जळगांव यांच्या कार्यालयात मुख्याध्यापक जितेंद्र निंबा पाटील यांचे विरोधात संस्थेचे दप्तर व कागदपत्र गहाळ केल्याबाबत तक्रार,
(२) दि.२३/०७/२०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी, जळगांव यांच्या कार्यालयात मुख्याध्यापक जितेंद्र निंबा पाटील व सर्व शिक्षकांनी संस्थाचालक, चेअरमन, सचिव यांचे बनावट सही शिक्के तयार करुन शासकीय अनुदान स्वतः वापरल्याबाबत..
(३) दि. २३/०७/२०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी, जळगांव यांच्या कार्यालयात जळगाव मुख्याध्यापक जितेंद्र निंबा पाटील यांनी संस्थेचे लेखापरिक्षण कार्यालयाबाबत व शालेय पोषण आहारात अनागोंदी कारभार केल्याबाबत.
(४) दि.२५/०६/२०१४ रोजी संस्था चेअरमन व सचिव यांनी शिक्षक भरती व कर्मचारी भरती मान्यता न देण्याबाबत मा. शिक्षणाधिकारी साो., (माध्यमिक) यांनी मुख्याध्यापक यांना दिलेले आदेशित पत्र.
(५) दि.२४/०८/२००९ रोजी शिक्षण सेवकांची नियुक्ती व मान्यता प्रस्ताव मंजुर न करणेबाबत मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व मुख्याध्यापक शिरसमणी यांना दिलेले आदेशित पत्र.
(६) दि.१५/१०/२०१३ रोजी मुख्याध्यापक जितेंद्र निंबा पाटील यांना शाळेत व संस्थेच्या मिटींगला अनुपस्थितीबाबत चेअरमन श्री. गोकुळ गिरधर यांची आदेशित नोटीस,
(७) संस्थेचे चेअरमन व सचिव व शाळेचे स्कूल चेअरमन यांनी दिलेल्या सूचना व नोटीस यांचा खुलासा देण्याऐवजी धमक्या व उद्धटभाषा वापरने बेशिस्तपणा करणे…
असे अनेक गुन्हे सदर मुख्याधापक करत असून मनमानीने कारभार कारत आहे म्हणून…
उपरोक्त बाबींच्या चौकशी साठी खलील प्रमाणे समिती नेमण्यात येत आहे.
(१ )श्री. विकास पाटील,शिक्षणाधिकारी (प्राथ) जि. प. जळगांव
(2) श्री. सचिन मगर ,अधिक्षक, शालेय पोषण आहार योजना पंचायत समिती यावल जि. जळगांव,
(३ )श्री. रियान तडवी,अधिक्षक, शिक्षणाधिकारी (माध्य) जि. प. नाशिक
उपरोक्त सर्व वार्वांची स्वयंस्पष्ट निष्कर्श व आपल्या शिफारशीसह अहवाल शिक्षणाधिकारी (माध्य) जि. प. जळगांव यांचे मार्फत या कार्यालयास कार्यालयीन आठ दिवसात सादर करावा.
(डॉ.बी.बी. चाण) विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग, नाशिक.
aonenewsmaharastra@gmail. com
उपसंपादक:-ज्ञानेश्वर सांगळे
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






