प्रतिनिधी सिन्नर:-भाऊसाहेब हांडोरे
नाचता येईना अंगण वाकडे…. राजीनामा दिलेल्या सदस्यावर कोळगाव माळ येथील सरपंच मुक्ताबाई चंद्रे यांची तिखट प्रतिक्रिया…
गेल्या २५-३० वर्षांपासून दहशतीचे, दबावाचे, व भ्रष्ट राजकारण मोडीत काढून सन २०२१ ला कोळगाव माळ येथील सुज्ञ मतदारांनी मतदान करून पिरसाई बाबा पॅनल ला प्रचंड बहुमताने विजयी करून गावाच्या विकासासाठी व गावातील गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन केले. दादागिरी, दहशत मोडीत काढून मुक्ताबाई चंद्रे या सरपंच पदावर विराजमान झाल्या. आणि सुरु झाला गावाचा विकास…ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करून सुशोभीकरण केले तसेच ग्रामपंचायत मध्ये नवीन फर्निचर केले, पूर्ण गावातील काटेरी झुडपे काढून गाव स्वच्छ केले , गावांतर्गत कधीच न झालेले सिमेंट काँक्रेट चे रस्ते पूर्ण केले , गावातील प्रत्येकाचे घरासमोर पाणी साचून अस्वछता होतं होती त्याकरिता पूर्ण गावभर भूमिगत गटारीचे काम पूर्ण केले, पिरसाई बाबा मंदिर व श्री हनुमान मंदिर सुशोभीकरण पूर्ण केले , जि. प. शाळेची दुरुस्ती करून सुधारणाकेली तसेच विध्यार्थ्यांच्या हक्काचे शैक्षणिक साहित्य दरवर्षी वाटप केले ,गावाच्या बाहेर भरतपूर, मढी, कोळगावपाटी, कोळपेवाडी जाणारे रस्ते काटेरी झूडपे काढून मुरूम टाकून दुरुस्त केले , हिंदू स्मशान भूमी परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर सुशोभीकरण केले , वृक्ष लागवड केले ,अपंगसाठीचा ५% निधी दरवर्षी वाटप केला, अंगणवाडी साठी चा निधी योग्य पद्धतीने वापर करणे, तसेच वाड्या वस्त्यावर पाणी पोहचविणे (ग्राम जलजीवन योजना), गावांतर्गत CCTV बसविणे, महिलांच्या आरोग्यासाठी तसेच बचत गटातील महिलांना स्वयम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. प्रधान मंत्री घरकुल योजना, शबरीमाता घरकुल योजना , रमाई माता आवास योजना, मोदी आवास योजना या व अशा अनेक लोकहिताचे कामे वैयक्तिक लक्ष देऊन गरजू व पात्र लाभार्थ्यांना फायदा करून देऊन २५-३० वर्षात न झालेली विकास कामे अवघ्या ३-४ वर्षात काळजीपूर्वक सर्वांनाच सोबत घेऊन तसेच कुठल्याही प्रकारचा भ्रष्ठाचार व गट -तट न करता पूर्ण केल्यामुळे पंचक्रोशीत गावाचे नाव लौकिक झाले .
थोड्याच कालावधीत झालेला एवढा विकास हा राजीनामा देणारे भ्रष्ट व अतृप्त सदस्य व गावातील काही स्वयंघोषित पुढाऱ्यांना स्वस्त बसून देत नव्हता. कायम ठेकेदारांना विनाकारण त्रास देणे, कमिशन मागणे, गरज नसतानी त्रास देण्याच्या हेतूने माहिती अधिकार अर्ज करणे , आंदोलन करणे अशा एक ना अनेक प्रकारे त्रास देऊन विकास करण्यापासून सरपंचांना व ग्रामपंचायतीला वेठीस धरण्याचेच काम ह्या सदस्यांनी केले आहे. सर्व गोष्टीचे समर्पक उत्तरे देऊन सुद्धा हेतूपुरस्कर कायम त्रास देऊन महिला सरपंच असल्याकारणाने माझी अवहेलना करत होते. एवढा त्रास देऊन सुद्धा सरपंच विकास करण्यापासून थांबतच नाही म्हणून की काय ग्रामपंचायत मध्ये सरपंच यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सहभाग नसतानाही सरपंच यांच्या कुटुंबाची विनाकारण बदनामी करणे असे प्रयोग सुरु झाले आणि त्या प्रवासाचा शेवट राजीनामे देण्या पर्यंत येऊन थांबला.
जनतेचा विकास करायचाय म्हणणारे अतृप्त सदस्य अजेंडे देऊन मासिक मिटिंगला, ग्रामसभेला कधीच हजर राहत नव्हते.मुळात त्यांना गावाच्या विकासापेक्षा स्वतःची टक्केवारी महत्वाची होती. विकास करणारे सदस्य मैदान सोडून पळून जाणारे नसतात आणि ते राजीनामा देत नाही. यावरूनच ग्रामस्थांच्या सर्व काही लक्षात आले आहे. ह्या सदस्यांना वाटते आम्ही ग्रामस्थांना भुलथापा देऊन फसवू पण जनता ह्या सदस्यांएवढी दूधखुळी नाही. सर्वाना समजते की हे राजीनामे विकासासाठी आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी आहे. जनतेने हे सर्व लक्षात ठेवावे असे आवाहन सरपंच यांनी केले आहे.
जनतेचा झपाट्याने होतं असलेला विकास यांना नको आहे कारण ३-४ वर्षात झालेल्या मोठ्या विकासामुळे यांचे महत्व कमी झाल्यामुळेच यांना गावात कोणीच किंमत देत नसल्यामुळे निराश होऊन तथ्यहीन आरोप करून गावाचा होतं असलेला विकास थांबवण्यासाठीच राजीनामा हे षडयंत्र केले आहे. यांना गावाचे काहीच देणे -घेणे नाही. फक्त स्वतःचाच फायदा करून घेणे साठीच यांचा प्रवास सुरु झालेला आहे.
मायबाप जनतेने अशा अतृप्त असलेल्या लोकांच्या भुलथापांना बळी न पडता गावाच्या विकासासाठी एकजुटीने साथ द्यावी. यांनी राजीनामे दिल्याने गावातील विकासाचे कोणतेही काम बंद राहणार नाही किंवा विकास थांबणार नाही अजून जोमाने काम सुरु राहणार आहे. लायकी नसताना निवडून दिलेल्या अतृप्त आत्म्याना जनतेने या पुढे त्यांची जागा दाखवून द्यावी व गावाच्या विकासासाठी एकत्र यावे .असे आवाहन केले.
श्रीमती. मुक्ताबाई विठ्ठलराव चंद्रे
सरपंच, ग्रामपंचायत कोळगावमाळ
प्रतिनिधी सिन्नर:-भाऊसाहेब हांडोरे
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






