प्रतिनिधी सिन्नर: भाऊसाहेब हंडोरे
दि. १३ डिसेंबर –सिन्नर तालुक्यातील पुर्व भागातील पांगरी,देवपुर ,शहा, पंचाळे, व शिंदेवाडी परिसरात वाघाचा धुमाकूळ घातला असून गुरुवारी रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास श्री, चंद्रकांत हांडोरे यांच्या गाईच्या गोठ्यात शिरूर तिन वासरांवर हल्ला केला व त्यांच्या गळ्यांचा लचका तोंडुन त्यांना जागीच गतप्राण केले. वाघ असल्याचे समजताच घरातील व आजुबाजूच्या लोकांनी इतर पाळीव प्राण्यांना जिवदान दिले वप पुढील धोका टळला परंतु याच रात्री या भागातील पाळीव कुत्रे व दोन बकर-या यांना हि फस्त केल्या असल्याचे श्री, चंद्रकांत हांडोरे यांनी “ए वन न्युज महाराष्ट्र”शी बोलताना सांगितले.
तालुक्यातील जवळपास सर्वच भागात वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका लहानशा मुलाला घरासमोरून उचलून नेले व त्यांचे लचके तोडून त्या बालकाचा मृत्यू झाला आहे,असे अनेक प्रकार जवळपास सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर दिसून येते आहे, त्यामुळे सरकारी यंत्रणेने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे परंतु तालुक्यातील आमदार – खासदार या गोष्टींवरून कुठंही बोलताना दिसत नाही कारण इतर गोष्टींकडे नेहमी अग्रेसर असणारे नेते या संवेदनशील प्रकाराकडे साफ दुर्लक्ष करतांना दिसत आहे. परंतु या कडे कानाडोळा न करता तालुक्याला धिर द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.
:
वाघ व बिबट्या दहशतीमुळे नागरिक घाबरून गेलेले आहे तरी त्वरित बंदोबस्त करावा अशी स्थानिकांची मागणी आहे — चंद्रकांत हांडोरे
(ANM): श्री, हांडोरे यांनी संबंधित वनाधिकारी यांना या बाबत माहिती दिली आहे. वावी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.
प्रतिनिधी सिन्नर:-भाऊसाहेब हांडोरे
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





