best news portal development company in india

शेतातील कचऱ्यातून शेतकऱ्यांना समृद्ध करणारा मानस असलेला उमेदवार अशोक मारुती मेश्राम…….

SHARE:

“शेतातील कचऱ्यातून शेतकऱ्यांना समृद्ध करणारा मानस असलेला उमेदवार अशोक मारुती मेश्राम…….

प्रतिनिधी राळेगाव:-

         शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतातील काडीकचरा तण ज्वारीचे फण कट तुरीचे फण कट तुराट्या पराठ्या तुमच्या बांधा वर उगवणारे तर इतर काडीकचरा यापासून सेंद्रिय खत निर्मिती तसेच प्लायवूड हार्ड बोर्ड तसेच पेपर कागद इत्यादी ची निर्मिती होऊ शकते. त्याकरिता कच्चा माल म्हणून हा काडीकचरा दहा रुपये किलोच्या वर भावाने शेतकऱ्यांचा खप होणार आहे. आणि शेतकऱ्यांना कचऱ्याचे पैसे मिळणार आहे तुरीचा कुटार सोयाबीन चा कुठे याला सुद्धा दहा रुपये किलोच्या वर भाव मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे किमान 50 हजार रुपये चे वर उत्पन्न काडी कचऱ्यापासून होणार आहे याचे जिवंत उदाहरण मी आपणास देतो बल्लारपूर येथील कागद कारखाना आणि या कारखान्यामध्ये दहा हजारच्या वर युवकांना रोजगाराची संधी आहे. या कारखान्यात दहा हजाराच्या वर लोक काम करतात तसा प्रकल्प तसेच कापूस ते थेट कापड निर्मिती या प्रकल्पात किमान दहा हजार लोक नोकरीला लागतील. तसेच सोया प्रकल्प व दुग्ध प्रक्रिया प्रकल्प यामध्ये पाच हजार नोकऱ्यांची तरतूद आहे हे सर्व प्रकल्प या मतदार संघात झाल्यास किमान 25000 तरुणांना नोकरी चा प्रस्ताव आहे. प्रत्यक्ष 25 हजार नोकऱ्या म्हणजे अप्रत्यक्ष एक लाख 25 हजार लोकांना रोजगार ही संकल्पना अशोक मारुती मेश्राम यांच्या डोक्यात आकार घेत आहे. आपण त्यांना एकदा उमेदवार म्हणून निवडून दिल्यास हे प्रकल्प प्रत्यक्षात आपल्या मतदारसंघात उभे राहू शकतात.ज्यामुळे ग्रामीण भागाचा शेतकरी शेतमजूर युवा तरुण बेरोजगार यांच्या जीवनाचा कायापालट होऊ शकतो. आणि ग्रामीण भाग महात्मा गांधीजीच्या स्वयंपूर्ण खेडी या संकल्पने प्रमाणे उन्नत होऊ शकतो गरज आहे.ती तुम्हाला विचार करण्याची आणि विचारपूर्वक निर्णय घेऊन कल्पकता असलेल्या अशोक मारुती मेश्राम या उमेदवाराला निवडून देण्याची आणि प्रत्यक्ष या प्रकल्पाचे साक्षीदार म्हणून तुम्हालाच साक्षीदार राहण्याची मी आपणास नम्र विनंती करतो.  असा मानस असलेल्या व कल्पकता असलेल्या उमेदवाराला आपण आपला जनप्रतिनिधी बनवावा.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई