प्रतिनिधी सिन्नर : भाऊसाहेब हांडोरे
राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या पक्षाच्या नेतृत्त्वाखाली अधिकृत उमेदवाराला पक्षातून च काढून टाकल्याने सिन्नर तालुक्यातील शरद शिंदे यांच्यावर मोठी नामुष्कीची वेळ आली आहे.
तालुक्यातील जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी व लोकांची गर्दी जमवण्यासाठी या उमेदवाराने चक्क बाई नाचवून पहाण्याचं ठरवलं आणि प्रसिद्ध गायिका सुरेखा पुणेकर यांना आमंत्रित करून कार्यक्रमाची तारीख जाहीर करून गर्दी जमवणयाचा प्रयत्न केला…
याबाबत सविस्तर वृत्त असे की सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते शरद शिंदे यांच्यावर स्वराज्य पक्षाच्या तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली होती व विधानसभा निवडणुकीत सिन्नर तालुका मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले व त्या अनुषंगाने सिन्नर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे व प्रतिस्पर्धी उमेदवार उदय सांगळे यांच्या विरोधात प्रचाराचे रणशिंग फुंकले.. प्रचार शिगेला पोहोचला असताना मध्येच माशी शिंकली..
त्याचं झाले असं कि . आपल्या बाजूने लोकांना आकर्षित करण्यासाठी ह्या महाशय उमेदारानं पक्षाचे नेते संभाजी राजे भोसले यांच्या सह जिल्ह्यातील नेते हे माझ्या प्रचारार्थ सिन्नर येथे येणार असल्याचे खोटे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पक्षाला आतापर्यंत न विचारता जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल असे कामं केल्याने स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष रुपेश नाडे यांनी श्री.शिंदे यांना पक्षातून काढून टाकल्याने आता चक्क त्यांच्या उमेदवारीलाच धोका निर्माण होऊ शकतो असे जानकरांच म्हणणं आहे.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





