best news portal development company in india

नाशिक ता. निफाड  लोनजाई माता मंदिरात श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने मंदिरात देवी महात्म्य पठण…..

SHARE:

से

नाशिक ता. निफाड  लोनजाई माता मंदिरात श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने मंदिरात देवी महात्म्य पठण…..

उपसंपादक:-ज्ञानेश्वर सांगळे

 ता.निफाड, विंचूर येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेले सुभाष नगर येथील लोणजाई माता मंदिर हे जागृत पुरातन देवस्थान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दर वर्षाप्रमाणे या २७ व्या वर्षी विंचूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने हजारोंच्या संख्येने श्री स्वामी समर्थ महिला व पुरुष सेवेकर्‍यांनी देवी महात्मा पाठ वाचन केले.

    _प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे (त्रंबकेश्वर गुरुपीठ) यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यातून निफाड, चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला, सिन्नर, नाशिक या शहरातील व विंचूर परिसरातील श्री स्वामी सेवेकरी महिला व पुरुष यांनी श्री क्षेत्र लोणजाई मातेच्या भव्य अशा मंदिरात नवरात्रीतील पाचवी माळ, ललिता पंचमीच्या_ _शुभमुहूर्तावर सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती २४२२ पाठ वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या पाठ करण्याचा हेतू या भारत मातेचे रक्षण व्हावे, परकीय आक्रमण होऊ नये, तसेच बळीराजा सुखी व्हावा, नैसर्गिक आपत्ती येऊ नये म्हणून या सामुदायिक पाठाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक सेवेकर्‍यांनी आई भगवतीच्या चरणी विनंती केली, गुरुमाऊलीने जो एक कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यासाठी स्वाभिमानाने सहभागी व्हा. कार्यक्रमाच्या शेवटी विंचूर ग्रामपालिका सदस्य दिलीप चव्हाण व मधकर बाबुराव दरेकर यांनी सह पत्नी महाआरती केली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडू शास्त्री महाले हे होते. कार्यक्रमासाठी उपस्थित सुभाष नगरचे सरपंच, उपसरपंच, सदस्य बापूसाहेब सोदक, चंदू लांडबले, कैलास सोनवणे, विलास गोरे व स्वामी सेवेकरी आदी उपस्थित होते. तसेच या दुर्गा सप्तशती पाठ कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.यांनी आपली भेट देऊन श्री स्वामी समर्थ कार्याचा गुणगौरव उत्तमोत्तम होवो अशी प्रार्थना मातेच्या चरणी केली.
कार्यक्रमाची सांगता फराळ व चहा वाटून करण्यात आली….

B    उपसंपादक :- ज्ञानेश्वर सांगळे, नाशिक

जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क:-       9422952513, 9637100608

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई