प्रतिनिधी नाशिक:-ज्ञानेश्वर सांगळे
नाशिक जिल्ह्यातील पेठ ता.आड बुद्रुक गावच्या ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार ग्रामस्थांनी विचारता प्रशासकीय अधिकाऱ्यांचे उडवा उडवी चे उत्तरे
https://www.youtube.com/@AoneNewsMaharashtra/videos
पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आड बुद्रुक येथील दि 18/092024 रोजी ग्रामसभा घेण्यात आली होती या ग्रामसभेत ग्रामस्थांनी 15 आयोगाची काम कामजाची माहिती विचारली असता. ग्रामसेवक/ सरपंच/ उपसरपंच/सदस्य.यानी सांगितले कि आपले गावातील ग्रामपंचायतच्या
(1)जिल्हा परिषद शाळेचे शौचालय बांधणे.
(2) जि. परिषद शाळेला पिण्याचे पाणी नळ देणे.
(3) जनावरांसाठी सार्वजनिक हौद बांधणे (4) ग्रामपंचायत सार्वजनिक शौचालय बांधणे (5) वैयक्तिक व सार्वजनिक कचरा कुंडी बांधणे (6) हातपंप दुरुस्ती करणे (7) सार्वजनिक विहीर कोबा करणे(8) वैयक्तिक कुटुंबाला नळ देणे (9) इंधन विहीर (10) सार्वजनिक विहीर सुरक्षा जाळी बसवणे (11) नविन पाणी पुरवठा मोटर खरेदी (12) विहिरीला खोली करणं करणे (13) शेतकरी अभ्यासालय व इतर कामे झालेली आहेत असे सांगितले मात्र काम झालेली नाहीत पण बिल काढलेली आहे हे ऐकून ग्रामस्थांची झोप उडाली .त्यानंतर ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना अर्ज दिला व चौकशी समिती नेमण्यात आली चौकशी समितीचे पी.सी पाडवी साहेब यांनी दि. 25/09/2024.रोजी येऊन प्रत्येक पाहाणी केली व आम्ही पुढील तपास करून आठ दिवसांत देऊ अहवाल देऊ असे सांगितले, पण आज 15 दिवस पुर्ण झालेले असून तरी अहवाल आलेला नव्हता म्हणून ग्रामस्थांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे यांना संपर्क केला, व सर्व प्रसंग सांगितला निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष मा.जितेंद्र भावे व राज्य सचिव नितीन रेवघडे यांनी जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांच्या कडे तपास करण्यासाठी सोपवला जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांनी स्वतः ग्रामस्थांशी संवाद साधुन प्रत्यक्ष कामांची पाहणी केली.व ग्रामस्था सोबत दि.08/10/2024-वार-मंगळवार . रोजी पंचायत समिती पेठ येथे गेले असता तेथील विस्तार अधिकारी पी.सी पाडवी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते, मात्र पाडवी साहेब हे सकाळी 11:00 वाजता पेठ तालुक्यातील आडगाव भवण येथे गेले आहेत , तशी तेथील हालचाल रजिस्टर वरती नोंद होती व पाडवी साहेब यांना फोन लावत होते पण फोन बंद येत होता,संपर्क होतं नसल्याने कारणाने नामदेव गावित यांनी तेथील स्थानिक नागरिक जयराम खुरकुटे यांना फोन करून विचार ना केली असता जयराम खुरकुटे यांनी आडगाव भवणचे ग्रामस्थ सकाळ पासून वाट पाहत आहेत असे सांगितले आता संध्याकाळ चे चार वाजुन गेले आहेत तरी आले नाहीत पाडवी साहेब यांच्याशी बोलणे झाल्या शिवाय प्रशासकीय विभागचे बागुल हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे निवेदन स्वीकारत नव्हते व कारणे देत होते, मग जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांनी त्यांना धारेवर धरून निवेदन स्वीकारने भाग पाडले.
पी.सी.पाडवी हे कामचूकारी करत आहेत हे लक्षात आले, यावेळी आड बुद्रुक येथील ग्रामस्थांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित ,चंदर गायकवाड, हिरामण गांगोडे. सुधाकर महाले, अनिल ठाकरे, निवृत्ती महाले, सत्यभामा भडांगे, रोहिदास महाले, मधुकर जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते ….
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




