best news portal development company in india

एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी धनगर समाजाची मागणी

SHARE:

एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी

 श्री समाधान बागल हिंदूधर्म रक्षक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक महाराष्ट्र राज्य

प्रतिनिधी नाशिक

महाराष्ट्रभरात धनगर समाजाचा तीव्र आंदोलन धनगर एसटी आरक्षणासाठी चालू असताना राज्यातील सरकार या गोष्टीकडे अजूनही पाहिजे त्या तातडीने लक्ष देत नाही ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे असे म्हणावे लागेल राज्यातील धनगर समाजाचा मुख्य प्रश्न हा एसटी आरक्षणाची अंमलबजावणी आहे कारण धनगर समाजाची घटनेच्या 36 नंबरला नोंद आधीपासूनच आहे मात्र काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी धनगर समाजाच्या काही लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना धनगर ऐवजी धनगड असा लेख असलेली जातीचे दाखले दिले परंतु हे जातीचे दाखले कुठल्याही प्रकारे जात पडताळणी समितीकडे वॅलीड होत नाही शिवाय ज्या लोकांना हे दाखले मिळाले ही लोकं धनगरच आहेत त्यांचे नातलग सोयरे संबंध सर्व धनगर समाजाचा आहे आणि असे असतानाही धनगर समाजावर अन्याय करून धनगर समाजाची एसटी आरक्षण अंबलबजावणी लांबीवर ठेवण्याचा महापाप चालू आहे त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालणं गरजेचं आहे आणि शिवाय धनगर आरक्षणात मुख्य प्रमाणावर व अहिल्यादेवी प्रबोधन मंच तर्फे हायकोर्टात असणाऱ्या केस मध्ये जेव्हा पुरावा म्हणून अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबाचा जो दाखला दाखवण्यात आला. तो दाखला हा चुकीचा आहे किंबहुना ज्या माणसांच्या नावाने हा दाखला आहे त्यांचे कुटुंबीय नातेवाईक सोयरे हे सर्व लोक धनगर असून तसे ऍफिडेवीट त्यांनी दिलेल आहे ह्या लोकांचे दाखले हे धनगर नावानेच आहेत अशा परिस्थितीत मराठा आरक्षणावेळी सखे सोयऱ्यांचा जीआर काढताना सखे सोयरे ही जर कुणबी असतील तर इतरांनाही कुणबी करावं अशा पद्धतीचा जीआर राज्य सरकारने मराठा समाजासाठी दिला मग धनगर समाजातील एका व्यक्तीच्या दाखल्यावरून संपूर्ण धनगर समाजाच्या न्याय हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्यात येतं हे कुठवर योग्य आहे याची राज्य सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या खालील मागण्या प्रामुख्याने पूर्ण कराव्या

1) अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील खिल्लारे धनगर कुटुंबाचं धनगर ऐवजी धनगड नावाचं झालेलं चुकीचं प्रमाणपत्र रद्द करावे

2) धनगर समाजाला धनगर व धनगड एकच आहे अशा पद्धतीचा जीआर काढून तात्काळ एसटी आरक्षणाचे दाखले देण्यास सुरुवात करावी

3) केंद्र सरकारने आत्ताच नवीन नियम तयार केल्याप्रमाणे एसटी आरक्षणाची अ ब क ड नियमावली तयार करून आत्ताचे एसटी आरक्षणातील सात टक्के आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण द्यावे व सदर आरक्षण हे अ ब क ड श्रेणीनुसार विभागून देण्यात यावे

4) धनगर समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करत असताना यामध्ये कुठल्याही प्रकारचा विलंब होणार असेल तर एसटी साठीच्या दिलेल्या सर्व सवलती या तत्काळ प्रभावाने धनगर समाजाला लागू करण्यात याव्या त्याचप्रमाणे नवीन वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन होस्टेल्स त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती या सर्व एसटी कॅटेगिरी च्या धरतीवर धनगर समाजातील विद्यार्थ्यांना तात्काळ देण्यात यावे

आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हा जीआर काढून धनगर समाजातील विद्यार्थी व होतकरू नवतरुण युवकांना एसटीचे दाखले हातात देण्यात यावी हे आमची प्रमुख मागणी राहील

 

व या मागण्या तात्काळ पूर्ण न केल्यास धनगर समाज याचे उत्तर येणाऱ्या काळातील इलेक्शन मध्ये 100% देणार समाजाला गृहीत धरून अज्ञानाचा फायदा घेऊन आत्तापर्यंत समाजाच्या न्याय हक्काचं आरक्षण आर्थिक नियोजन व नोकऱ्या लुटण्यात आल्या व ही स्वतंत्र भारतात एका समाजाची झालेली उघड पणाची लूट आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली आहे त्यामुळे या आंदोलनाची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा आंदोलन अजून मोठ्या प्रमाणात तीव्र करण्यात येईल

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई