best news portal development company in india

राळेगाव विधानसभा मतदारसंघात अशोक मारुती मेश्राम यांची पत्रकार परिषद…

SHARE:

दि. 27 सप्टेंबर शुक्रवारला शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) राळेगाव ,,येथे माननीय   अशोक मारुती मेश्राम.    यांनी घेतली पत्रकार परिषद….

प्रतिनिधी राळेगाव 

घेऊन राळेगाव मतदार संघातील प्रलंबित असलेली विकास कामे आणि लोकांची समस्या याबाबत पत्रकार बंधूंना अवगत करून दिले ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर बांधवांची परिस्थिती अत्यंत भीषण असून त्यांना 75 वर्षाच्या स्वतंत्र भारतात अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे, ही परिस्थिती आज ग्रामीण भागावर आलेली आहे याचे सर्व श्रेय आजी-माजी लोकप्रतिनिधीवर जाते.

आज ग्रामीण भागातील लोकांना अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या मूलभूत सुविधा पासून सुद्धा वंचित राहावे लागते. ग्रामीण भागातील मोजक्या शिक्षित झालेल्या युवा वर्गाला रोजगार नाही,मतदार संघामध्ये रोजगार निर्मिती करणारा एकही प्रकल्प आज पर्यंत स्थापित झाला नाही, हा मतदारसंघ बंपर कापूस झोन असून येथे कापसावर प्रक्रिया करणारी व त्यापासून कापड निर्मिती करणारे उद्योग व्यवसाय नाही, अर्थात सूतगिरणी कापड गिरणी तसेच सोयाबीनवर प्रक्रिया करणारे सोया प्लांट न सल्याने शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये सेंद्रिय खत उपलब्ध करून देणारे खत प्रकल्प नाही ,दुग्ध व्यवसायाला या मतदारसंघांमध्ये चालना देण्यात आलेली नाही की ज्यातून रोजगाराची निर्मिती होईल असे कोणतेही प्रकल्प या मतदारसंघांमध्ये नाही तीस वर्षांपूर्वी या मतदारसंघांमध्ये एमआयडीसीची कल्पना मांडण्यात आली होती परंतु आज पर्यंत एमआयडीसीची कल्पना साकारण्यात आलेली नाही ही कल्पना हवेत उडून गेली आहे.

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पांदन रस्ते नाही आज जी काही पांदण रस्ते आहे ते अतिक्रमणग्रस्त आहे, तसेच पांदन रस्ते अति पावसामुळे खराब झालेली आहेत,त्याला नाल्याचे स्वरूप सुद्धा आलेले दिसते. शेती करत असताना शेतकऱ्यांची बैलगाडी सुद्धा त्याच्या शेतापर्यंत जाऊ शकत नाही शेतकऱ्याला शेतात पिकांना देण्यासाठी आवश्यक असलेले खते डोक्यावर वहावे लागतात व शेतात उत्पादित झालेला शेतीमाल डोक्यावरून वहन करावा शेतातील पीक सुरक्षित नाही जंगली जनावरे शेतातील पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात शेतकरी एवढे करूनही शेतातून पीक काढतो आहे त्याच्या पिकाला बाजारामध्ये योग्य भाव मिळत नाही त्यामुळे लावलेला खर्च कधीकधी निघत नाही उत्पन्न तर सोडा त्याला कर्जातच जगाव लागते आणि कर्जातच मरावे लागते हे मी प्रत्यक्ष माझ्या आजोबा पंजोबापासून पहात आलो आहे अशी भीषण परिस्थिती असताना मी शिक्षण घेतले आणि अधिकारी झालो शासनाची सेवा केली व सेवेतून मुक्त झाल्यावर माझ्या मतदारसंघातील माय भूमीचे माझ्यावर असलेले ऋण आणि या भूमीमध्ये वसणारे माझे शेतकरी शेतमजूर छोटे व्यावसायिक छोटे व्यापारी बांधव यांच्या दुःखाला समजून घेऊन त्यांच्या करिता काहीतरी करावं त्यांना काहीतरी न्याय मिळवून द्यावा त्यांना योग्य मार्गदर्शन करावे त्यांना नियोजन शिकवावे त्यांना व्यसनापासून मुक्त करावे त्यांच्या क्रयशक्तीला कसे वाढवता येईल त्यांचा बुद्ध्यांक शिक्षणाच्या माध्यमातून कसा उंचावता येईल त्यांचे आरोग्य कसे ठणठणीत करता येईल त्यांच्या न्याय मागणीला कसे शासन दरबारी मांडता येईल आणि त्यातून त्यांना न्याय कसा मिळेल तसेच त्यांच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या गरजांची पूर्ती कशी करता येईल या दिशेने माझे नियोजन आहे आणि त्या नियोजनाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनामध्ये विकासात्मक बदल घडून येईल यासाठी मी 24 तास या मतदारसंघात काम करण्यासाठी आलेलो आहोत.

या मतदारसंघातील मी सर्व माझ्या ग्रामीण शहरी भागातील लोकांना नम्र विनंती करतो की आपण एकदा मी विचार करतो आहे या पद्धतीने आपणही विचार करावा आणि आपण सर्वांचे जीवन सुंदर आणि उन्नत करण्यासाठी मला आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आज पर्यंत जी काही जनप्रतिनिधी मंडळी आपल्यापर्यंत आली आहे आपल्याला मताचा जोगवा मागून गेली आहे त्या मंडळीने आपल्या सोबत विश्वासघात केलेला आहे त्या मंडळीने आपल्या विकासाचा विकास निधी मतदार संघावर खर्च न करता त्यांनी आपले घर भरलेले आहे एक साधा शिक्षक तीस वर्षात अरबोपती होतो आहे

ज्या शिक्षकाकडून समाज परिवर्तनाच्या आणि समाज घडवण्याच्या अपेक्षा समाज करतो आहे त्याच शिक्षकांनी ग्रामीण भागातील जीवन उद्ध्वस्त करून टाकले आहे आज ग्रामीण भागामध्ये स्मशान शांती दिसते आहे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद ऐवजी दुःखाचे सावट दिसते आहे अशी भीषण परिस्थिती स्वतंत्र भारत देशाच्या ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे. काय यालाच म्हणतात स्वराज्य?
काय आम्ही स्वराज्य मागून चूक केली काय?
काय याचसाठी आम्ही स्वराज्याचा अट्टाहास केला होता काय?

आमच्या सर्व जनप्रतिनिधींना हृदयापासून कळकळीची विनंती आहे प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी मर्यादे आतलं जीवन हे सुंदर असत अन्यथा मर्यादेच्या पलीकडे जीवन विद्रुप होतो हे आपण विसरले काय?

इतिहास साक्षी आहे. जग जिंकणाऱ्या सिकंदराला जगाचे ऐश्वर्य भोगता आले नाही त्याला मायदेशी परत जाताना वाटेतच हागी लागून मरण आले काय मिळवले त्यांने? मरणाच्या आधी त्याच्या डोक्यात हा विचार आला की जग जिंकून सुद्धा संपत्ती ऐश्वर्या मिळून सुद्धा माणसाचं जीवन हे क्षणभंगुर आहे त्याला हे सर्व सोडून जावं लागतं मग जग जिंकण्याचा अट्टहास धन ऐश्वर्या मिळवण्याचा अट्टहास हा चुकीचा भाग आहे पण वेळ निघून गेली होती आता काय करणार म्हणून त्याने जगाला संदेश देण्याचं विचार केला आणि त्याच्या सेवकाला त्याने सांगितलं की माझं प्रेत जेव्हा स्मशानभूमीत घेऊन जातील तेव्हा माझे दोन्ही हात तिरडीच्या बाहेर ठेवावे जेणेकरून जगाला संदेश मिळेल जग जरी जिंकलं तरी मी खाली हाताने जग सोडत आहोत मी केलेली चूक यापुढे कोणीही करू नये असाच त्याचा मतितार्थ होता.

आमच्या जनप्रतिनिधींनी या गोष्टीतून बोध घ्यावा शरीराचे भोग भोगण्यापेक्षा संयमी जीवन जगणे आपल्या येणाऱ्या मुलाबाळावर योग्य संस्कार आणि शिक्षण देऊन त्यांना सुसंस्कारित करणे हीच खरी संपत्ती असून ही संपत्ती कधीही न संपणारी संपत्ती आहे याच संपत्तीचे जतन सर्वांनी करावं यापेक्षा मोलाचे दान काहीही असू शकत नाही हेच मी माझ्या पुढच्या जीवनामध्ये जगणार आहोत आणि समाजाचं माझ्याकडे असलेल ऋण मी फेडण्यासाठी उमेदवार म्हणून या मतदारसंघात आलेलो आहे.

या माझ्या मतदारसंघातील बंधू-भगिनींना युवक मित्रांना नम्र विनंती की आपण माझी ही संकल्पना साकार करण्यासाठी मला मदत करा, मदत करा, मदत करा.

   जय हिंद,जय भारत,                        जय मातृभूमी.
   आपला हक्काचा माणुस
    अशोक मारुती मेश्राम
    ७७-रालेगांव विधानसभा               मतदारसंघ उमेदवार

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई