best news portal development company in india

के.बी.एच. हायस्कूल, गिरणारे येथे पालक-शिक्षक संघ व माता पालक संघाची बिनविरोध स्थापना; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा-पालकांनी एकत्र काम करण्याचा निर्धार…

SHARE:

प्रतिनिधी:गोरख कसबे,गिरणारे

गिरणारे : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित के.बी.एच. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पालक-शिक्षक संघ आणि माता पालक संघ कार्यकारिणीची लोकशाही पद्धतीने बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालक यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक पुंडलिक नाना थेटे उपस्थित होते. व्यासपीठावर माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दिलीप थेटे, विजय थेटे, रवींद्र थेटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन भामरे, पर्यवेक्षिका सुनीता निकम, ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण भामरे, संजय नागरे, उद्धव गांगुर्डे, वैशाली पवार आणि सीमा पाटोळे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. पर्यवेक्षिका सुनीता निकम यांनी प्रास्ताविकातून पालक-शिक्षक समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. संगीत शिक्षक हेमंत संगमनेरे व गीत मंचाने स्वागतगीत व ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. मुख्याध्यापक नितीन भामरे यांनी सर्व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.

यानंतर संजय नागरे यांनी पालक-शिक्षक संघ व माता पालक संघाची रचना, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती याविषयी माहिती दिली. त्यानंतर लोकशाही पद्धतीने दोन्ही संघांच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पालक-शिक्षक संघाची कार्यकारिणी

पदसिद्ध अध्यक्ष : नितीन भामरे (मुख्याध्यापक)
उपाध्यक्ष : रवींद्र थेटे,सचिव : संजय नागरे
सहसचिव : मोतीराम सोनवणे
शिक्षक प्रतिनिधी (सहसचिव) : अक्षय थेटे
सदस्य : योगिता मोरे, पार्वती धोंगडे, मनीषा कसबे, भास्कर बंदावणे, नामदेव थेटे, शिवाजी लोणके

माता पालक संघाची कार्यकारिणी
पदसिद्ध अध्यक्ष : नितीन भामरे
उपाध्यक्ष : गौरी हरक
सचिव : वृषाली कापसे
सहसचिव : रोहिणी पठाडे
शिक्षक प्रतिनिधी (सहसचिव) : वंदना खांदवे
सदस्य : सुगंधा मोरे, सविता जावळे, सीमा कुंदे, पार्वती मोंढे

नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्यांचा मुख्याध्यापक नितीन भामरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात मुख्याध्यापक नितीन भामरे यांनी शाळेच्या आगामी शैक्षणिक योजना, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, नियमित उपस्थिती, वर्गातील सक्रिय सहभाग आणि गुणांपेक्षा शिकण्याच्या कौशल्याला अधिक महत्त्व देण्याची भूमिका स्पष्ट केली. “मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा आणि पालक हा एकाच रथाची दोन चाके असून दोघांचा समान सहभाग आवश्यक आहे. पालक मेळाव्याचा उद्देश केवळ गुणांची चर्चा नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा आहे,” असे त्यांनी सांगत पालकांच्या विविध प्रश्नांचे समाधानकारक निरसन केले.
अध्यक्षीय समारोपात पुंडलिक नाना थेटे यांनी शाळा आणि पालक यांच्यातील सुसंवाद विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली कापसे व योगिता कुयटे यांनी केले, तर कविता अहिरराव यांनी आभार मानले. सुनिता शेटे यांनी फलकलेखन केले. शेवटी संगीत शिक्षक हेमंत संगमनेरे यांनी पसायदान सादर केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

सत्य • वेगवान • विश्वासार्ह बातम्यांसाठी“एवन न्युज महाराष्ट्र” 
संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 9422952513
प्रतिनिधी: गोरख कसबे
ए वन न्युज महाराष्ट्र
गिरनारे
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई