best news portal development company in india

४ हजार कोटींच्या निविदांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप; एसआयटी चौकशीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आ. सुहास (अण्णा) कांदे यांचा ठिय्या…

SHARE:

प्रतिनिधी:ए वन न्युज महाराष्ट्र, मुंबई

मुंबई:राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी काढण्यात आलेल्या सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार सुहास (अण्णा) कांदे यांनी गुरुवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले.

या निविदा प्रक्रियेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत आ. कांदे यांनी संबंधित निविदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

यावेळी आ. कांदे यांनी समीर भुजबळ हे या कथित घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करत त्यांच्या भूमिकेचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता न राखता काही विशिष्ट कंत्राटदारांना लाभ मिळावा, यासाठी नियमबाह्य पद्धतीने निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

आंदोलनादरम्यान आ. कांदे यांनी सांगितले की, जनतेच्या कराच्या पैशातून राबविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची सत्यता जनतेसमोर आणावी, अशी त्यांनी मागणी केली.

दरम्यान, या आरोपांवर संबंधित विभागाकडून किंवा समीर भुजबळ यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. या प्रकरणाची चौकशी होणार का आणि सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

– ए वन न्यूज महाराष्ट्र

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई