best news portal development company in india

वावीत ‘गोदावरी दूध प्रॉडक्ट’च्या अधिकृत स्टॉलचा शानदार शुभारंभ…
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन; पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SHARE:

ए वन न्यूज महाराष्ट्र | विशेष वृत्त…….

नाशिक | प्रतिनिधी: भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

सिन्नर: तालुक्यातील वावी येथे नागरिकांना आता दर्जेदार आणि विश्वासार्ह दुग्धजन्य पदार्थ सहज उपलब्ध होणार आहेत. सिन्नर–शिर्डी रोडलगत सुरू करण्यात आलेल्या गोदावरी दूध प्रॉडक्टच्या अधिकृत स्टॉलचे उद्घाटन रविवारी (दि. ५ जुलै) उत्साहपूर्ण वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

स्टॉलचे उद्घाटन सिन्नर नगर परिषदेचे नगरसेवक अनिल सरवार तसेच जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. पत्रकार भाऊसाहेब हांडोरे डोरे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या स्टॉलमुळे वावी, शाहा, पिंपरवाडी व परिसरातील नागरिकांना गोदावरीचे दूध तसेच विविध दर्जेदार दुग्धजन्य उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यास प्रहार पक्षाचे अध्यक्ष कैलास दातीर, पांडुरंग आगळे, वावीचे सरपंच विजय काटे, शाहा गावचे सरपंच संभाजी जाधव, जीएसटी न्यूज ‘आवाज महाराष्ट्राचा’चे संपादक सुरेंद्र गडवे, लखन नवले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गोदावरी दूध प्रॉडक्टच्या गुणवत्तेचे कौतुक करत, ग्रामीण भागात दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ग्राहकांसाठी निश्चितच लाभदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच स्टॉलच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्टॉलचे संचालक अभिषेक हांडोरे यांनी सांगितले की, उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, भविष्यात ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा व गोदावरीचे सर्व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.

ग्रामीण भागात दर्जेदार दुग्धजन्य उत्पादनांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने वावी येथील हा अधिकृत स्टॉल महत्त्वपूर्ण ठरणार असून, परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्युज महाराष्ट्र
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई