best news portal development company in india

जनआरोग्य योजनांतील कोट्यवधींच्या संशयास्पद गैरव्यवहाराचा मुद्दा विधानसभेत; आमदार डॉ. राहुल आहेर यांचा सरकारला जाब, कठोर कारवाईचे आश्वासन…

SHARE:



मुंबई: ए वन न्युज महाराष्ट्र, प्रतिनिधी

   महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर मुद्दा चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत (EOW) सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच अपहार झालेल्या निधीची वसुली करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली.

डॉ. आहेर यांनी सभागृहात मांडलेल्या माहितीनुसार, 2024 ते 2026 या कालावधीत 16 हजारांहून अधिक संशयास्पद प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी सुमारे 9,500 प्रकरणे नाशिक जिल्ह्यातील असून, 8,500 दावे केवळ पाच रुग्णालयांमध्ये दाखल झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच एकाच मोबाईल क्रमांकावरून हजारो रुग्णांची नोंदणी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणामागे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सभागृहात 15,407 संशयास्पद प्रकरणे आढळल्याची माहिती दिली. या प्रकरणांशी संबंधित रुग्णालयांवर एफआयआर दाखल करण्यात आले असून त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच या प्रकरणाचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासनही आरोग्यमंत्र्यांनी सभागृहात दिले.

राज्यातील गरीब व गरजू नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य योजनांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत असून, आता सरकारच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई