best news portal development company in india

MAHA TET पेपरफुटी प्रकरणावरून राज्य सरकारवर रोहिणी खडसेंचा घणाघात; “पेपरफुटीचे सत्र थांबवण्याचे नाव घेत नाही”

SHARE:


मुंबई ए वन न्युज महाराष्ट्र प्रतिनिधी

राज्यात स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) संदर्भात पेपरफुटीबाबत धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

रोहिणी खडसे म्हणाल्या की, राज्यात स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांच्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून, दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना होणार नाहीत यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत.

पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई