सिन्नर | प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे सिन्नर
सिन्नर : तालुक्यातील गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भगूर–पांढुर्ली रस्त्याच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून, या निर्णयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आपल्या आंदोलनाला दिले आहे. पक्षाचे सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या ‘सरण आंदोलनानंतर’ शासनाने रस्त्याच्या कामाला मंजुरी देत युद्धपातळीवर काम सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे.
भगूर–पांढुर्ली मार्गावरील रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली होती. पांढुर्ली, शिवडे, घोरवड, धोंडबार, बेलू परिसरातील नागरिकांसह सिन्नर–घोटी मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने वाहतूक धोकादायक बनत होती.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यामुळे अनेक अपघात घडले असून अनेकांना दुखापती झाल्या. शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिकांमधून रुग्णांना ने-आण करतानाही मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः गर्भवती महिलांना रुग्णालयात नेताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या प्रश्नावर अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र अपेक्षित कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर शेतकरी व कार्यकर्त्यांसह रस्त्यावर सरण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर शासनाने रस्त्याच्या कामाला मंजुरी देत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याचा दावा पक्षाने केला आहे.
रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आभार मानले आहेत. तसेच शासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेत काम सुरू केल्याबद्दल पक्षाच्या वतीने शासनाचेही आभार व्यक्त करण्यात आले.
या आंदोलनासाठी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, निरीक्षक भुसारा सर, खासदार भगरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
आंदोलनात तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्यासह पुंजाराम हारक, रतन तुपे, शिवाजी गुंजाळ, नामदेव वाजे, नारायण शेळके, शिवराम बर्कले, चिंधू गुंजाळ, राहुल रूपवते, संतुजी वाजे, लक्ष्मण तुपे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


एवन न्युज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





