best news portal development company in india

शिवसेनेच्या आंदोलनाला यश; रास्ता रोको आंदोलन स्थगित…अपघातग्रस्तांना ठेकेदाराकडून मदत, नागरिकांच्या एकजुटीचा विजय : नगरसेवक प्रवीण जाधव..

SHARE:


प्रतिनिधी: एवन न्युज महाराष्ट्र,नाशिक

नाशिक :दिंडोरी रोडवरील रस्त्याच्या कामादरम्यान झालेल्या अपघातानंतर शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला यश मिळाले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सौ. उज्वला सीताराम गायकवाड यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमी सौ. दिपाली दिलीप बेळे यांच्या वैद्यकीय उपचारांचा संपूर्ण खर्च संबंधित ठेकेदाराने उचलण्यास संमती दर्शविली आहे. याबाबत दोन्ही कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती नगरसेवक प्रविण मंदाकिनी रमेश जाधव यांनी दिली.
या सकारात्मक निर्णयामुळे उद्या आयोजित करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन सध्या स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा नगरसेवक जाधव यांनी केली.
यावेळी त्यांनी मेरी–म्हसरूळ परिसरातील नागरिक, शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रसारमाध्यमे आणि प्रशासनाचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून नागरिकांच्या एकजुटीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, रस्ते कामांबाबत शिवसेनेची भूमिका कायम ठाम असल्याचे स्पष्ट करत त्यांनी पुढील मागण्या पुन्हा अधोरेखित केल्या.
रस्त्याच्या कामांमध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.
नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजीपणाला कोणतीही माफी दिली जाणार नाही.
अपघातग्रस्तांना तातडीने न्याय व योग्य मदत मिळालीच पाहिजे.
नगरसेवक प्रविण जाधव यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेचा संघर्ष यापुढेही अविरत सुरू राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

— A One News Maharashtra

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी”एवन न्युज महाराष्ट्र” 
संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 9422952513////9637100608

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई