प्रतिनिधी:एवन न्यूज महाराष्ट्र,वडनेर भैरव
नाशिक:वडनेर भैरव येथे शाळकरी अल्पवयीन मुलीचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल केल्याच्या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मन्सूर सादिक मणियार या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, गावातील नागरिक आता एकवटले आहेत.
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना नितीन ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “वडनेर भैरव येथे घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. शैक्षणिक संस्था या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी असतात, भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी नाहीत. समाजातील प्रत्येक घटकाने अशा प्रकरणांविरोधात ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
गावातील पालक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने एकत्र येत आरोपीविरोधात कठोर भूमिका घेत आहेत. “मुलींच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना कोणतीही माफी नाही,” अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. गावात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा…
एवन न्यूज महाराष्ट्र
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





