best news portal development company in india

“रामकुंडावर रंगणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचा भव्य सोहळा; गंगा-गोदावरी महाआरतीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन”…

SHARE:

प्रतिनिधी:एवन न्युज महाराष्ट्र,नाशिक

नाशिक : हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती, नाशिक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. शनिवार, दि. 31 मे रोजी सायंकाळी 6 वाजता पंचवटी येथील रामकुंड परिसरातील अहिल्या घाटावर हा भव्य-दिव्य सोहळा पार पडणार आहे.



यंदाच्या सोहळ्याची संकल्पना “महा कुंभ” अशी असून, गंगा-गोदावरी महाआरती, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक विधी तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक आणि समाजहिताच्या कार्याचा गौरव करणारे विविध उपक्रम यावेळी आयोजित करण्यात आले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील तीर्थक्षेत्रांचे जतन, घाट, मंदिरे, धर्मशाळा उभारणी तसेच समाजहितासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या जयंती सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक समितीच्या वतीने देण्यात आली.



या कार्यक्रमासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे हे गंगा-गोदावरी महाआरतीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच होळकर घराण्याचे वंशज मुकुंद राजे होळकर, बाजीराव शिंदे, पणन संचालनालय पुणे, आमदार राहुल ढिकले, विविध साधू-संत, सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

समिती अध्यक्ष समाधान बागल यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे.


यावेळी समिती सदस्य व मार्गदर्शक दिगंबर भाऊ मोगरे, राजेंद्र बागुल, ऋषीं ढापसे, विनायक काळदाते, संगीताताई पाटील, कोथिंबीर दादा अमोल गजभार, योगेश पानसरे, श्याम गोसावी, भूषण जाधव, प्रशांत बागल, भांड साहेब, राजाभाऊ बदाड, देवराम रोकडे, वैभव रोकडे, अण्णासाहेब सपनार, कल्पेश शिंदे, शिरोळे सर आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्युज महाराष्ट्र” संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड, उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे 9422952513
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई