best news portal development company in india

फलटणमध्ये महिलांसाठी BIS कडून गुणवत्ता-सुरक्षेचे विशेष प्रशिक्षण…
स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांना प्रमाणित उत्पादनांची ओळख, अन्न भेसळ तपासणी व आरोग्य-स्वच्छतेचे मार्गदर्शन..

SHARE:

प्रतिनिधी : दत्तात्रय घुले, धामोरी (अहिल्यानगर)
फलटण, दि. १६ मे २०२६ : भारतीय मानक ब्युरो (BIS) यांच्या मार्गदर्शनाखाली रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था तर्फे फलटण नगर परिषद अंतर्गत आत्मनिर्भर शहर स्तर संघ येथे स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांसाठी जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांना गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रमाणित उत्पादनांची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमात दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये खेळण्यांची सुरक्षितता व इलेक्ट्रिक खेळणी, बालकांचे पोषण व अन्न भेसळ ओळख, फीडिंग बाटल्यांचा सुरक्षित वापर, कचरा वर्गीकरण व बायोगॅस, मासिक स्वच्छता व बाल संगोपन, तसेच प्रौढ व वैद्यकीय वस्त्र उत्पादने, स्वयंपाकघरातील भांडी, प्रेशर कुकर, गॅस स्टोव्ह, मातीची भांडी, फ्रीज अशा विविध बाबींवर प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.

या प्रशिक्षणात महिलांना ISI चिन्हांकित व प्रमाणित उत्पादने कशी ओळखावीत, अन्नातील भेसळ सोप्या पद्धतीने कशी तपासावी, तसेच स्वच्छता व आरोग्याच्या सवयी कशा अंगीकाराव्यात याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले. महिलांनी स्वतःबरोबरच समाजातही ही माहिती पोहोचवावी, असे आवाहनही करण्यात आले.

पुणे येथून BISच्या रिसोर्स पर्सन सौ. मेघना रोंगे व सौ. रसिका पुरंदरे यांनी प्रभावी सादरीकरणातून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास रणरागिणी संस्थेच्या संचालिका तथा मुख्याध्यापिका श्रीमती शाहीन शेख, सौ. राझिया शेख, सचिव श्री. मारुती टकले, हिना सय्यद, अनिसा सय्यद, नगरपालिकेचे श्री. शिरतोडे सर, सौ. विद्या रिठे, सुप्रिया फडतरे, सौ. सोनल आंबोळे, सौ. रेश्मा कणसे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. शेवटी सहभागी महिलांना नाश्ता व भेटवस्तू देण्यात आल्या.

हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी आणि सुरक्षित जीवनशैली अंगीकारण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला.

सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी”एवन न्यूज महाराष्ट्र

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी”एवन न्यूज महाराष्ट्र”
संपादक l:अरुण चंद्रभान गायकवाड, 9422952513
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे, 9637100608
प्रतिनिधी:दत्तात्रय घुले
एवन न्यूज महाराष्ट्र
धामोरी (अहिल्यानगर)
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई