प्रतिनिधी: निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोपरगाव : बारावी, दहावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. कार्यक्रमास सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर आणि कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले, “आजचा गुणवंत विद्यार्थी हा उद्याचा सक्षम भारत घडवणारा शिल्पकार आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, मेहनत आणि जिद्द हाच त्यांच्या यशाचा खरा पाया आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हास्यकवी अशोक नायगावकर यांनी आपल्या खास शैलीतील कवितांमधून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचा संदेश देत उपस्थितांना खळखळून हसवले आणि विचार करायलाही भाग पाडले.
कार्यक्रमास कारभारी नाना आगवन, ज्ञानदेव मांजरे, नारायण मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, गौतम सहकारी बँकेचे व्हाइस चेअरमन विजयराव रक्ताटे, कारखान्याचे संचालक दिलीपराव बोरणारे, शंकरराव चव्हाण, श्रीरामराजे भोसले, दिनाजी कुदळे, प्रशांत घुले, वसंतराव आभाळे, विष्णू अण्णा शिंदे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धर्मशेठ बागरेचा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकान, महेश लोंढे, गौतम बँकेचे संचालक श्रीजी लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चारुदत्त सिग्नर, माजी नगराध्यक्ष विजयराव वाहाडणे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शशिकांत देवकर, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाघचौरे, जनार्दन कदम यांसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचा सन्मान होत असताना सभागृहात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड,9422952513
उपसंपादक: ज्ञानेश्वर यशवंत सांगळे,9637100608

एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





