best news portal development company in india

तमाशा परंपरेतून पोलीस सेवेपर्यंत झेप — कु. मुस्कान मणियारची मुंबई पोलीस दलात निवड; शहा गावाचा अभिमान वाढला…

SHARE:

प्रतिनिधी: भाऊसाहेब हांडोरे ,सिन्नर
सिन्नर | दि. १६ मे — कला, संस्कृती आणि परंपरेची समृद्ध परंपरा जपणाऱ्या कुटुंबातील कन्येने आज शासकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. जेष्ठ तमाशा कलावंत, वगसम्राट कै. शब्बीरभाई अहमदभाई मणियार यांच्या नात आणि शहा (ता. सिन्नर) येथील श्री नसीर शब्बीरभाई मणियार यांची कन्या कु. मुस्कान नसीर मणियार हिची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. या यशामुळे शहा गावासह संपूर्ण सिन्नर तालुक्यात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर कु. मुस्कान हिने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. मर्यादित साधनसंपत्ती, ग्रामीण पार्श्वभूमी आणि स्पर्धेची तीव्रता यांवर मात करत तिने पोलीस भरतीत यश संपादन केले. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींना नवे ध्येय आणि प्रेरणा मिळाली आहे.

मुंबई पोलीस मध्ये निवड


या निवडीबद्दल गोकुळ नरोडे (उपतालुका प्रमुख, शिवसेना सिन्नर) यांनी कु. मुस्कानचे अभिनंदन करत तिच्या कुटुंबीयांचेही कौतुक केले. “तमाशा कलावंतांच्या कुटुंबातून आलेल्या या कन्येने पोलीस सेवेपर्यंत झेप घेत शहा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे,” असे ते म्हणाले.
गावकऱ्यांनीही कु. मुस्कानचे जल्लोषात स्वागत केले असून, तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. “ग्रामीण भागातील मुली संधी मिळाल्यास कोणतीही उंची गाठू शकतात,” असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
कला परंपरेचा वारसा आणि शासकीय सेवेची नवी ओळख यांचा सुंदर संगम घडवत कु. मुस्कान मणियार हिने स्वतःसह आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि तमाशा कलावंत परंपरेचे नाव उज्ज्वल केले आहे.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी” एवन न्यूज महाराष्ट्र”
संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड 9422952513
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे 9638100608
प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई