प्रतिनिधी: एवन न्यूज महाराष्ट्र,नाशिक
नाशिक :नाशिक महानगरपालिकेकडून सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी अंतर्गत विविध विकासकामांना वेग देण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांपैकी होळकर पूल व दुतोंड्या मारुती परिसरातील मार्ग पुढील दोन महिन्यांसाठी सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. ही वाहतूक बंदी १६ मे ते १६ जुलै या कालावधीत लागू राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ऑक्टोबर महिन्यापर्यंत विविध पायाभूत सुविधा पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याने संबंधित कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत कामाच्या ठिकाणी नागरिक व वाहनांची वर्दळ राहिल्यास कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या काळात होळकर पूल व दुडिया मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. विशेषतः कामाच्या परिसरात अनावश्यक गर्दी टाळावी, जेणेकरून विकासकामे वेळेत आणि सुरक्षितरीत्या पूर्ण होऊ शकतील.
दरम्यान, प्रशासनाने एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे की अस्थी विसर्जन विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेश खुला राहील. त्यामुळे धार्मिक विधीसाठी येणाऱ्यांना अडचण येणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने ही कामे सुरू असून, नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा महापालिकेने व्यक्त केली आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





