प्रतिनिधी निफाड
नैताळे (निफाड): विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यातील नैताळे येथील श्री गणपती देवस्थानच्या मालकीच्या सुमारे ३ एकर जमिनीवर काही भूमाफियांनी वक्रदृष्टी वळवली असून, कागदपत्रांत फेरफार करून ही जमीन हडपण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नैताळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, “देवाच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा सज्जड दम प्रशासनाला आणि फसवणूक करणाऱ्यांना दिला आहे.
नैताळे येथील स.नं. १०५/३/अ आणि गट क्र. ९० ही सुमारे ३ एकर ५ गुंठे जमीन पूर्णपणे श्री गणपती देवस्थानच्या मालकीची आहे. १९१८ मध्ये मूळ मालकाने ही जमीन देवाला दान केली होती. मात्र, अलिकडच्या काळात काही व्यक्ती ही जमीन स्वतःची असल्याचे भासवून तिची विक्री किंवा हस्तांतरण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा गावात सुरू आहे.
ग्रामस्थांनी पुराव्यासह गंभीर आरोप केले आहेत:
नियमबाह्य नोंद (क्र. ४४७): १९७८ मध्ये कोणत्याही चावडी नोटिसीशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेशिवाय तलाठी दप्तरी नियमबाह्य नोंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
खोटा वारसा हक्क: मृतांच्या वारसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून, देवस्थानची जमीन हडपण्यासाठी कागदोपत्री फेरफार केल्याचा आरोप आहे.
जनतेची फसवणूक: ही जमीन देवस्थानची असतानाही, ती खाजगी असल्याचे दाखवून लोकांची फसवणूक करण्याचा डाव रचला जात आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रसिद्ध विधीज्ञ अॅड. इंद्रभान रायते आणि अॅड. श्रीकांत रायते यांच्यामार्फत महसूल विभागाला आणि जनतेला जाहीर नोटिसीद्वारे सूचित करण्यात आले आहे. या जमिनीच्या रेकॉर्डमध्ये कोणताही फेरबदल करू नये, असे आदेशात्मक आवाहन करण्यात आले असून कायदेशीर प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.
या बाबत तानाजी छबु डावखर, बाबाजी भागवत डावखर, शांताराम गंगाधर डावखर आणि समस्त नैताळे ग्रामस्थांनी एकत्र येत इशारा दिला आहे की”खरेदी-विक्री केल्यास जेलची हवा खावी लागेल!”
“ही जमीन देवाच्या चरणी अर्पण केलेली आहे. या जमिनीवर कोणीही खरेदी-विक्री, गहाण किंवा बँकेचा बोझा चढवू नये. असा कोणताही व्यवहार केल्यास तो कायदेशीररीत्या रद्दबातल (Illegal) ठरेल आणि संबंधित व्यक्तीवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.”
नैताळे परिसरातील या देवस्थान जमिनीच्या व्यवहारातून लोकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यापूर्वी जमिनीची सत्यता पडताळून पाहावी आणि अशा फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. नैताळ्यातील गायरान प्रकरणानंतर या प्रकरणाने आता संपूर्ण निफाड तालुक्यात खळबळ उडाली असून, महसूल विभाग यावर काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





