सिन्नर | प्रतिनिधी – भाऊसाहेब हांडोरे | ए वन न्यूज महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात लाल कांद्याच्या दरघटीमुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने मेहनतीने पिकवलेला कांदा मेंढ्या-शेळ्यांना चारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सिन्नर तालुक्यातील शहा गावातील शेतकरी गोरख दामू तासकर यांनी एक एकरात सुमारे 70 ते 80 क्विंटल लाल कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र बाजारात मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने त्यांनी हा कांदा बाजारात न नेता स्वतःच्या मेंढ्यांना चारण्याचा निर्णय घेतला.
लाल कांदा पिकवताना शेतकऱ्यांना बियाणे, मशागत, लागवड, खते, तणनाशके, औषधे, मजुरी, काढणी आणि पॅकिंग असा मिळून जवळपास 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र सध्या बाजारात मिळणारा दर इतका कमी आहे की उत्पादन खर्चदेखील निघत नाही.
शेतकरी सांगतात, “कांदा मार्केटला नेला तर गाडीभाडे देऊन रिकाम्या हाताने घरी यावे लागते. त्यापेक्षा सडून जाण्यापेक्षा मेंढ्यांना चारलेले बरे!”
कांदा लागवडीवेळी मोठ्या अपेक्षेने घेतलेले कर्ज, कुटुंबाच्या गरजा आणि भावी नियोजन या सर्व स्वप्नांवर पाणी फिरले आहे. “शेतात पेरा काहीही, उगवतं मात्र कर्जच!” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
राज्यभर गेल्या महिनाभरापासून लाल कांद्याचे दर घसरले आहेत. निर्यात धोरण, बाजारातील हस्तक्षेपाचा अभाव आणि हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला किमान हमीभाव जाहीर करावा, खरेदी केंद्रे सुरू करावीत आणि निर्यातीवरील निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी होत आहे.
सिन्नरमधील ही घटना केवळ एका शेतकऱ्याची नाही, तर राज्यातील हजारो कांदा उत्पादकांच्या वेदनेचे प्रतीक आहे. मेहनतीने पिकवलेला सोन्यासारखा माल डोळ्यादेखत मेंढ्यांना चारावा लागणे, ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी असून कृषी व्यवस्थेतील गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधणारी आहे.
(ए वन न्यूज महाराष्ट्र – सिन्नर)
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





