प्रतिनिधी
श्रीरामनगर:जि.प. शाळा श्रीरामनगर येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा सोहळा ग्रामस्थांसाठी एक पर्वणीच ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य मा. श्री. शिवा सुरासे उपस्थित होते. यावेळी मा. सरपंच श्री. त्रंबकराव आण्णा काळे, मा. सरपंच श्री. संपत खताळे, चेअरमन मा. भिमराज कळे (सर), मा. सरपंच श्री. भगवान दादा शिंदे, मा. चेअरमन ना. भाऊसाहेब शिंदे, मा. चेअरमन श्री. अशोक कोंढरे, मा. उपसरपंच श्री. विनायक शिंदे, मा. उपसरपंच श्री. किरण गाडेकर, मा. मनोज काळे, मा. उपसरपंच श्री. मधुकर शिंदे, मा. उपसरपंच श्री. हांडोरे, मा. गाडेकर साहेब, मा. भागवत खताळे तसेच शालेय समिती अध्यक्ष मा. भाऊसाहेब शिंदे, उपाध्यक्ष मा. बाळासाहेब गोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते, पारंपरिक नृत्य, सामाजिक संदेश देणारी नाटिका आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. लहानग्या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त दाद दिली.
प्रमुख पाहुणे शिवा सुरासे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “ग्रामीण भागातील शाळांमध्येही विद्यार्थ्यांमध्ये अफाट प्रतिभा दडलेली आहे. योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास ही मुले भविष्यात नक्कीच मोठे यश संपादन करतील.” त्यांनी शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी सरपंच व इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देण्यात आली.
शालेय समिती, सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वर्ग यांच्या परिश्रमातून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थित ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे कौतुक करत शाळेच्या प्रगतीसाठी कायम पाठबळ देण्याचा संकल्प व्यक्त केला.
ग्रामीण भागातील शाळेत भरलेला हा सांस्कृतिक मेळा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





