best news portal development company in india

१.५० कोटीहून अधिक गरजू रुग्णांना मोफत आरोग्यसेवा ,१२ जानेवारी २०२६ रोजी रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे ‘सारथी’ पुरस्कार वितरण सोहळा…आरोग्यसेवा, चिंतन–मंथन आणि सेवाभावी व्यक्तींचा होणार सन्मान…

SHARE:

नाशिक प्रतिनिधी

नाशिक:मानवतावादी आरोग्य सेवेत गेली दोन दशके कार्यरत असलेल्या रेड स्वस्तिक सोसायटीची राज्य महोत्सवी सभा सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती रेड स्वस्तिक सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष श्री. जे. बी. पाटील यांनी दिली आहे.भारतीय परंपरेतील पवित्र प्रतीक असलेले ‘स्वस्तिक’ हे आरोग्य, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. याच संकल्पनेतून सन २००१ पासून रेड स्वस्तिक सोसायटी देशभर आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून आजपर्यंत किमान १.५० कोटीहून अधिक गरजू रुग्णांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यात आली आहे.

रेड स्वस्तिक सोसायटीचा हा राज्य महोत्सवी सोहळा नाशिक येथील श्री.प्रभू श्रीरामांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आयोजित करण्यात आला आहे.दोन सत्रांत होणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन कॉलेज रोड विद्यानगर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा प्रकल्पातील शर्मन सभागृहात’ करण्यात आला आहे.

  सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या पहिल्या सत्राचे उद्घाटन माजी अतिरिक्त सहकार आयुक्त व पणन संचालक श्री. सुनील पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सुयश हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत पाटील, माजी निवृत्त न्यायाधीश श्री. गुलाबराव पाटील तसेच सरपंच परिषदचे कार्यवाहक श्री. योगेश पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेनरिक हेल्थ अँड रिसर्च सेंटरचे संचालक श्री. ज्ञानदेव चोपडे भूषविणार आहेत.

या महोत्सवी सभेला रेड स्वस्तिक सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष व लायझन पाड युपचे कार्यकारी संचालक श्री. सुरेशराम कोते, सोसायटीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. टी. एस. भाल (IPS), कार्याध्यक्ष श्री. भगवान राठोड, उपाध्यक्ष श्री. विनयभाई पटेल, सहमहासचिव श्री. अशोक शिंदे, श्री. प्रमोद नांदगावकर, श्री. हेमंत मोरे, श्री. देवर्षी पटनायक यांच्यासह देशभरातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत .

महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार असून, हा सोहळा समाजाला प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास रेड स्वस्तिक सोसायटीने व्यक्त केला आहे.मानवतेच्या सेवेत निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘सारथी’ पुरस्कार यंदा महाव्यवस्थापक तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील वरिष्ठ अधिकारी श्री. प्रमोद नांदगावकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
  या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच तंजावर (तामिळनाडू) घराण्याचे शिवछत्रपतींचे सोळावे वंशज श्रीमंत श्री. विजय सिंह राजे भोसले यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एच.सी.जी. मानवता कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्री. राज नगरकर भूषविणार आहेत.
या कार्यक्रमात भविष्यातील आरोग्यसेवा, मंचरचना तसेच आगामी काळात नाशिक कॅम्पसमधील आरोग्यसेवा नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती रेड स्वस्तिक सोसायटीचे नाशिकचे कार्यकारी अध्यक्ष श्री. जे. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    या सोहळ्यास नाशिक शहर व परिसरातील सेवाभावी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने करण्यात आला आहे.
   मानवतेच्या सेवेत कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा सन्मान करणारा हा सोहळा समाजात सकारात्मक प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई