प्रतिनिधी:प्रकाश शिंदे,कोपरगाव
एवन न्यूज महाराष्ट्र

कोकमठाण, (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ आय (752I) वरील गोदावरी नदीच्या पुलाला तडा गेल्यामुळे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महामार्ग अभियंत्यांनी वाहतूक व्यवस्था बंद केली आहे. या महत्त्वपूर्ण पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी कोकमठाण चौफुली, मुंबई-नागपूर हायवे रोड येथे ८ डिसेंबर २०२५ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवाजी कवडे पाटील यांनी ग्रामविकास अधिकारी/सरपंच, कोकमठाण यांना यापूर्वी २० दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. या निवेदनात गोदावरी नदीच्या पुलाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती, कारण हा पूल तडे गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतेही सकारात्मक उत्तर न मिळाल्याने आणि पुलाची दुरुस्ती न झाल्याने, नागरिकांनी अखेरीस उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.


आरोग्य विभागाला उपोषण स्थळी भेट देण्याचे आवाहन
उपोषणकर्ते शिवाजी कवडे पाटील यांनी केला, त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी ग्रामपंचायतीला विनंती केली आहे की, उपोषणाच्या अनुषंगाने मेडीकल विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत पुढील योग्य कार्यवाहीसाठी ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी किंवा ग्रामविकास अधिकारी/सरपंचांनी स्वतः उपोषण स्थळी भेट द्यावी आणि निवेदन स्वीकारून आंदोलनाची दखल घ्यावी.
या उपोषणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुलाच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
प्रतिनिधी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





