best news portal development company in india

एकलव्य आदिवासी परिषद प्रणित रॉयल टायगर ग्रुपच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी किसन सोनवणे यांची नियुक्ती..!

SHARE:

प्रतिनिधी:किसन सोनवणे,कारवाडी

     कारवाडी (प्रतिनिधी): एकलव्य आदिवासी परिषद प्रणित रॉयल टायगर ग्रुप, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कारवाडी येथे आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात किसनराव सोनवणे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात असून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
    महाराष्ट्र राज्य एकलव्य आदिवासी संघटनेचे अध्यक्ष मा. मंगेश भाऊ अवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मा. अवताडे यांनी दलित, आदिवासी, आणि वंचित समाजातील समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले.


    या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन किसनराव सोनवणे आणि प्रकाशराव शिंदे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी, संघटनेच्या कार्याप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठा आणि योगदानामुळे किसनराव सोनवणे यांची अधिकृतपणे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली.
    यावेळी व्यासपीठावर मा. मंगेश भाऊ अवताडे, प्रकाशराव शिंदे, संपतराव मोरे, नवनाथ सोनवणे, बोला पवार, बलराज घे, गडमल गौरम, गायकवाड, दत्तात्रय उन्हाळे, दादासाहेब सोनवणे, दत्तात्रय वाकळे, बाबासाहेब बंदरे यांच्यासह संघटनेचे आणि परिसरातील अनेक मान्यवर पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य प्रणित रॉयल टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य, पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांनी शुभेच्छा दिल्या...

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई