best news portal development company in india

श्रीमंत राजे नानासाहेब होळकर , श्रीमंत मुकुंदराजे होळकर यांच्या शुभहस्ते…होळकरवाडा ( रंगमहाल ) येथे राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२५ भव्य  बक्षीस वितरण समारंभ संपन्न…

SHARE:

संपादक:अरुण गायकवाड,उपसंपादक:ज्ञानेश्वर सांगळे,”एवन न्यूज महाराष्ट्र”या चॅनलला लाईक,सबस्क्राईब व शेअर करा..

जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9422952513 / 9637100608

प्रतिनिधी

रविवार,दिनांक- २ नोव्हेंबर २०२५
     चांदवड :आज चांदवड होळकरवाडा (रंगमहाल) या ठिकाणी”जागर शिवशाही ते होळकरशाही उपक्रमांतर्गत” भारतीय इतिहास प्रबोधिनी मुंबई  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन मुंबई आयोजित राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२५ भव्य बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात चांदवड येथील होळकरवाडा  रंगमहाल  येथे साजरा करण्यात आला.
        या भव्य बक्षीस वितरण सोहळ्यात श्रीमंत राजे नानासाहेब होळकर,श्रीमंत मुकुंदराजे होळकर,डॉ देवीदास पोटे  कार्यक्रम अध्यक्ष, डॉ. रमिला गायकवाड ( मुंबई ), प्राचार्य अन्वर शेख ( बीड ), डॉ. रमेश पिसे ( नागपूर ), डॉ. प्रेरणा राऊत ( पालघर ), डॉ. तुषार चिंचोले ( नाशिक ), प्राचार्य दत्तात्रय बारगळ, राजीव हाके ( धुळे ), सुभाष पवार ( सहाय्यक मॅनेजर ), प्रा.डॉ. सुरेश पाटील, समाधान बागल, डॉ. वर्षा चौरे, प्रा. सुभाष वाल्हेकर ( त्र्यंबकेश्वर ) आदी मान्यवर उपस्थित होते.


       कार्यक्रमाचे सुरूवातीला श्रीमंत राजे नानासाहेब होळकर , श्रीमंत मुकुंदराजे होळकर यांच्या शुभहस्ते… नगरपरिषद येथील शिवप्रतिमेचे पुजन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राजगादीचे पूजन व महाआरतीने करण्यात आले.
       विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये १) अनुश्री चौधरी ( जळगाव ) २) रणरागिणी शिंपले ( धाराशिव ) ३) कनिष्का म्हात्रे ( कल्याण ) ४) शुभम खरात ५) प्रा. अरूणा वाघोले ( आळेफाटा ) ६) प्रा. स्नेहा महांबरे ( गोवा ) ७) कुंदा कुलकर्णी ( मालेगाव ) ८) रमा शिंदे ( पुणे ) या निवडक विद्यार्थ्यांनी होळकरशाही व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारीत भाषणे केली.
        प्रमुख अतिथींचे मार्गदर्शनपर भाषणे झाली त्यानंतर लगेचच विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. यामध्ये विजेते विद्यार्थी राजनंदिनी रूपाली विठ्ठल पडार व काशी का करिष्मा जयेंद्र म्हात्रे हे गट अ मधील प्रथम विजेचे असून प्रणव मयुरी शशिकांत जाधव, विश्वराज कविता अमर पाटील, वेदांत अवंती शिवप्रसाद नाईक, शौर्य जयश्री शिवाजी ठोंबरे हे गट अ मधील द्वितीय विजेचे आहे. तसेच गट अ मधील उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांमध्ये अनुश्री चौधरी, हर्षदा मिरगडे, रमा शिंदे ,आरोही भोसले, जयवर्धन गवळी, आनंदी इंगळे, ज्ञानेश्वरी फडफड ,मैथिली कोकरे, अपूर्वा नांदूरकर ,श्रेया वाकसे हे असून  तसेच गट ब मधील प्रथम बक्षिसे प्रतिभा उज्वल हेमंत बंडगर, शुभम संगीता बाळासाहेब खरात, गट ब द्वितीय पारितोषिक पायल अर्चना राहुल थेटे, भाग्यश्री लतिका किशोर काळे, हे  आहे,गट ब मधील उत्तेजनार्थ विद्यार्थी घनश्याम पाटील ,अंजली कोळेकर, यानंतर गट क मधील प्रथम क्रमांक  स्नेहा सुवास प्रभू महंबरे ,अजय भागीरथी दिलीप सकटे ,गट क मधील  द्वितीय पारितोषिक नेहा वर्षा सुनील जाधव, अरुण रणरागिनी प्रियंका झेलम शिंपले गट क मधील उत्तेजणार्थ चंद्रकांत डुंबरे कुंदा कुलकर्णी वनिता झुरळे अरुणा वाघोली या विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली.



         आदी विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. जे विजेते अनुपस्थित होते त्यांना पोस्टाने पारितोषिक पाठविले जातील असे संयोजकांनी सांगितले.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाडवी ( बाळा ) यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. वर्षा चौरे यांनी केले. कार्यक्रमास चांदवड शहरातील असंख्य महिला मंडळाच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला. तसेच शांताराम हांडगे सर, समाधान बागल, गुड्डू खैरनार, संजय चौबे, दत्तात्रय राजनोर, नितीन शिंदे, मनोज बांगरे, किरण वाघ, सागर बर्वे, किशोर दीक्षित, महेश खंदारे, गणेश पारवे, राजू झांबरे, सोनू पवार आदी नागरिकांनी उपस्थिती नोंदविली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राजगादीचे पूजनाचे पौरोहित्य अमोल दीक्षित यांनी केले.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई