संपादक:अरुण गायकवाड,उपसंपादक: ज्ञानेश्वर सांगळे,” एवन न्यूज महाराष्ट्र” या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा.

जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा. 9422952513 / 9637100608
प्रतिनिधी नाशिक

निफाड:निफाड तालुक्यातील नांदगाव येथे जय बजरंग जेष्ठ नागरिक संघाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली .या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नाशिक जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व आखिल भारतीय जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष मा.अशोक नाना होळकर हे होते.या कार्यक्रमास खासदार मा.भास्कर मुरलीधर भगरे सर यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी भारतनगर नाशिक जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मा.उत्तमराव कडलग, फेसकाॅम नाशिक चे सचिव मा.धनंजय चतूर,निफाड तालूका जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मा.रमाकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त करून जेष्ठ नागरिक संघाचे ध्येय, उद्दिष्टे,व फायदे विशद केले.या प्रसंगी महाराष्ट्राचे जेष्ठ सुप्रसिद्ध कवी प्रा.लक्ष्मण महाडिक यांनी हा नुसताच जेष्ठ नागरिकांना फायदा व्हावा यासाठी स्थापन झालेला नसून, जेष्ठ नागरिकांच्या फायदया बरोबरच गावातील तरूणांना मार्गदर्शनाच्या भूमिकेत असला पाहिजे मग ते मार्गदर्शन गावाच्या विकासासाठी धार्मिक, शैक्षणिक, सहकार व राजकीय असले पाहिजे.त्याच बरोबर गावातील मंदिराबरोबरच गावातील शाळेला ज्ञानमंदिर समजून त्या सरस्वतीच्या मंदिराकडे लक्ष दिले पाहिजे.
याच बरोबर त्यांनी ग्रामीण भागातील शेती मातीवर अधारीत,बियांचे भिडती,गगनाला दर,पिकांना बाजार,माती मोल यासारख्या अनेक कविता सादर करून जेष्ठ नागरिक संघातील रसिकांना मंत्रमुग्ध केले.अध्यक्षीय मनोगतात अशोक नाना होळकर यांनी जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न त्यामध्ये, आरोग्य, प्रवास, सुरक्षितता,पेन्शन घरकुल योजना,जेष्ठांना कर्ज मर्यादा वाढविणे,ग्रामपंचायत च्या जागेवर जेष्ठ नागरिक संघाचे ऑफिस बांधणे व महिलांचा जेष्ठ नागरिक संघ स्थापन करणे या सर्व सुविधांचा पाठलाग महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांचे कडे चालु आहे त्यासाठीच जेष्ठ नागरिकांनी संघटित होऊन लढा दिला पाहिजे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शेवटी आभार नांदगाव चे भूमिपुत्र व माजी प्राचार्य अॅड नवनाथ केरू निकम सर यांनी केले.
बजरंग जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी श्री.शिवाजी लहानु निकम -अध्यक्ष ,श्री.रामकृष्ण बंडूनवले ,उपाध्यक्ष ,श्री.निवृत्ती कारभारी निकम-सचिव,श्री.प्रभाकर निवृत्ती निकम-सहसचिव,श्री.माधव ञंबक निकम-खजिनदार,श्री.शंकर विठ्ठल निकम- सदस्य,श्री.तुकाराम रंगनाथ नवले- सदस्य,श्रीम.सुंदराबाई रघुनाथ निकम- महिला सदस्य
याची निवड करण्यात आली,सर्वांचे नियुक्तीबद्दल अध्यक्ष मा.अशोक नाना होळकर यांचे शुभ हस्ते सन्मान करण्यात आला व सर्व सभासदांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्याससाठी सर्व नांदगाव जेष्ठ नागरिक व तरुण कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




