पांढुर्ली नाशिक:-गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, नुकसानीग्रस्त भागांची, शेतीची व पिकांची पाहणी करून तातडीने शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत, असे निर्देश कृषिमंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शेतकऱ्यांना योग्य व त्वरित मदत मिळवून देण्यासाठी आणि त्यांना उभारी देण्यासाठी, राज्याचे कृषिमंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब सदैव कटिबद्ध आहे. या कठीण प्रसंगी शासन तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास मी यावेळी बळीराजाला दिला.
महाराष्ट्र सह नाशिक जिल्ह्यातील सर्वंच ठिकाणी अवकाळी व गारपिटीचा तडाखा बसला आहे.वादळी वा-यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटाका बसला आहे.. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचे थैमान घातले आहे. या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सर्वत्र जोरदार हजेरी लावली. या उकाड्याने हैराण झालेल्या चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे परंतु या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.शेतातील उन्हाळ कांद्याच्या काढणीला जोरदार सुरुवात झाली होती परंतु पावसामुळे या पिकाची नासाडी झाली असून तोंडांत असलेला घास हिरावला गेला आहे.तसेच द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.. मागील आठवड्यात सोनांबे परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यावेळी गारांचा पाऊस झाला असून त्यामुळे शेतातील कांदा.माका. द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच दोन दिवसांपासून सुरू असलेला या अवकाळी पावसामुळे सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या अनुषंगाने राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता या अवकाळी पावसामुळे किती मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले हे लक्षात घेऊन त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशा सुचना त्यांनी संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.. या पावसामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी घराचं छप्पर उडालेले आहे तर अनेक गावांमध्ये कांदा शेड व जनावरांच्या गोठा यांचेही नुकसान झाले आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





