पत्रकार:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर:- तालुक्यातील श्री क्षेत्र दापूर( काळेवाडी)येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी 10/2/2025 रोजी श्री.खंडोबा यात्रा भरवण्यात आली होती.श्री खंडोबा महाराज देवस्थान यात्रेनिमित्त येथे श्री खंडोबा क्रिकेट क्लब आयोजित “भव्यदिव्य चेअरमन चषक 2025” आयोजित क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.या अंडरम क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन युवांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री.उदयजी भाऊ पुंजाजी सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले होते.सदर क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 40 संघांनी स्पर्धेकरीता सहभाग घेतला होता.
यामध्ये विविध प्रकारचे चांगले बक्षिसे ठेवण्यात आली होती. श्री समाधान आव्हाड यांच्या तर्फे 15555/-पारितोषिक होते,द्वितीय पारितोषिक श्री नवनाथ आव्हाड यांच्या तर्फे 9999/- देण्यात आले,तृतीय पारितोषिक श्री ज्ञानेश्वर आव्हाड यांच्यातर्फे 7777/- देण्यात आले, तसेच चतुर्थ पारितोषिक सौ.सुनिता आव्हाड यांच्या तर्फे 5555/-पारितोषिक देण्यात आले तसेच श्री.ऍड. सुरेश आव्हाड यांनी आकर्षक भव्य चषकसाठी सौजन्य केले.
तसेच श्री. शिवाजीशेठ दराडे यांनी संपूर्ण खंडोबा मित्र मंडळासाठी टी- शर्टचे वाटप केले. या कार्यक्रमासाठी खंडोबा मित्र मंडळाचे जेष्ठ सदस्य अशोक काळे,संतू काळे,प्रभाकर आव्हाड,राजाराम आव्हाड, भाऊसाहेब कांदे, किरण आव्हाड, सोमनाथ काळे, श्रीरामशेठ आव्हाड, नवनाथ काळे,दत्तू आव्हाड, ज्ञानेश्वर साबळे, कचूनाना आव्हाड, मारुती आव्हाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्यावतीने श्री. चरण आव्हाड, श्री. अमोल आव्हाड व श्री.संदीप काळे यांनी केले,सर्वं खंडोबा मित्र मंडळाचे सदस्यांनी व ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले.
श्री.क्षेत्र खंडोबा महाराज देवस्थान, दापूर
काळेमळा भगतवाडी,नेहेरवाडी….
. पत्रकार:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





