best news portal development company in india

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर चांदवड जवळील रेणुका माता मंदिर घाट माथ्यावर मेंढपाळ बांधवांचा व मेंढ्यांचा भीषण अपघात…. 

SHARE:

 

मेढपाळ बांधवांचे अपघातात मोठे नुकसान पाच ते सहा मेंढ्या चा मृत्यू, 5/6 मेंढया जखमी, तीस वर्षीय युवक गंभीर जखमी

सविस्तर वृत्त….
 प्रतिनिधी नाशिक:- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन चांदवड येथील रेणुका माता घाट माथ्यावर मेंढ्यांचे मालक पोपट मांगु टकले (वय 50/51वर्ष ),गाव – डिगा वे तालुका साक्री जि.धुळे) हे मेंढ्यांचा कळप घेऊन दुपारी 2ते 2.5दरम्यान आपल्या गावाकडे जात असताना मागून येणारा महिंद्रा कंपनीचा नवीन टेम्पो जोरात मालेगावच्या दिशेने जात होता, टेम्पो ड्रायव्हरने नशा केलेली असल्यामुळे या ड्रायव्हरचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या बाजूने जाणाऱ्या मेंढ्या यांच्या कळपावर टेम्पो गेला व कळपातील दहा ते बारा मेंढ्या उडवल्या यातील पाच ते सहा मेंढ्या अक्षरशः पूर्ण चिरडल्या गेल्या व पाच ते सहा मेंढ्या जखमी गंभीर झाल्या, तसेच तीस वर्षे युवकाला जोराची धडक बसली यामुळे तोही जखमी झाला आहे, या कळपामध्ये काही मेंढ्या या गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले आहे. यावेळी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे त्यांचे पालन पोषण करणाऱ्या मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यूने मेंढपाळांनी मोठा आक्रोश व्यक्त केला. हे दृश्य बघून मन हेलावून गेले. 
 हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळी मेंढ्याच्या रक्त मांसाचा अक्षरशः सडा पडलेला होता. संपूर्ण रस्त्यात मेंढ्यांच्या मृत्तावस्थेत पडल्या होत्या.तसेच देविदास पोपट टकले वय वर्ष 29 ते 30 याला गंभीर डोक्याला व छातीला दुखापत झाली.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक वाघ साहेब यांनी घटनेची दखल घेऊन मेंढपाळ बांधवांना सुविधा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले . त्यावरती उपचार चालू आहे.चालकाच्या मध्य धुंड नशेच्या निष्काळजीपणामुळे मेंढ्या चिरडल्या गेल्या आहेत.मेंढपाळाने आरोपी ट्रक चालकावर कठोर कारवाई करत नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. या अपघातानंतर महामार्गावर मेंढ्यांचे मृतदेह पडले होते. नाशिक जिल्हा मेंढपाळ आर्मीच्या टीमा पोहोचल्या.
  अक्षरशः या परिस्थितीतील मेंढपाळ बांधवांची ही परिस्थिती बघून मन हेलावुन गेले.मेंढपाळ बांधवांना कुठल्याही प्रकारे अपघात झाल्यानंतर विमा मिळत नाही किंवा कुठल्याही सरकारी निधी मदत मिळत नाही. सरकारने याकडे लक्ष देऊन मेंढपाळ बांधवांना मदत द्यावी आणि मेंढपाळ बांधवांचा सरकार तर्फे विमा उतरवावा. गेली दीड महिन्यात महिन्यात चांदवड येथे दोन ते तीन अपघात झाले. मेंढपाळ बांधवांना मेंढ्या चारण्यासाठी ग्रेझिंग कोरिडॉर तयार करावे. मेंढपाळांवरती होणाऱ्या हाल्यावरती सरकारने कठोर कारवाई करावी.शासकीय व्यवस्था जागी कधी होणार…? मेंढपाळांना संरक्षण कधी मिळणार… असाही सवाल मेंढपाळ बांधवांकडून यावेळेस करण्यात आला.
 गोरक्षक,मेंढपाळ आर्मी नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य
श्री समाधान बागल
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई