best news portal development company in india

यंदाचे वर्ष हे भारतभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरे…

SHARE:

स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी जे चौहान माध्यमिक विद्यालय मोरवाडी सिडको नाशिक च्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची होळकर वाडा रंगमहाल येथे क्षेत्रभेट……

     यंदाचे वर्ष हे भारतभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहेत त्यानिमित्त शाळेतर्फे एक अनोखा उपक्रम आयोजित केला गेला. 
       इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी चांदवड येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुरातन वास्तू रंगमहाल येथे भेट देत अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीस आणि कर्तृत्ववान इतिहासात उजाळा दिला.
हिंदू धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री समाधान बागल व सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत वाघ यांनी सर्वांना अत्यंत मोलाचे सहकार्य केले. विशेष परिश्रम घेत या मुलांना चांदवड म्हणजेच होळकर नगरीचा इतिहास आणि राजमाता अहिल्यादेवी यांच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती दिली
होळकर वाडा ही पुरातत्त्व वास्तू असून मातोश्री अहिल्यादेवींनी उपराजधानी म्हणून चांदवडची निवड केली होती. रंगमहालात गेल्यानंतर होळकर नगरीचा इतिहास विद्यार्थ्यांना मा.श्री.समाधान बागल यांनी समजावून दिला. अहिल्यादेवींचे प्रशासकीय गुण, आत्मविश्वास , धारिष्ट्य, हे आजच्या काळामध्ये आपण आत्मसात करणे गरजेचे आहे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या गजराने संपूर्ण होळकर वाड्याचा परिसर दुमदुमला. एकूणच ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली.
   याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ. अलका चंद्रात्रे यांनी शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. 
     क्षेत्रभेटीसाठी मा.मुख्याध्यापिका उज्वला माळी, पर्यवेक्षिका शुभदा टकले यांचे मोलाचे मार्गदर्शन व शाळेचे शिक्षक चित्रा येवले, प्रिया पवार, जितेंद्र गायकवाड यांचे सहकार्य लाभले.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई