
aonenewsmaharashtra@gmail.com
प्रतिनिधी:- रवींद्र धारणे,त्र्यंबकेश्वर
सालाबाद प्रमाणे मध्यप्रदेशचे भूतपूर्व मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांनी दि. ३ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी ठीक ९.३० वा. सहकुटुंब मंदिरात रुद्राभिषेक करुन दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी सोवळे परिधान करुन गर्भगृहात रुद्राभिषेक पुजा करुन सभामंडपात सहपरीवार पुजा आरती केली. यावेळी त्यांच्या पत्नी व पुत्र कुणाल हे देखील उपस्थित होते…
पुजेचे पौरोहित्य वे. श्रीनिवास (वामन) गायधनी, गौतम गायधनी, हरिष गायधनी, अक्षय शुक्ल, शार्दूल लोहगावकर, विराज मुळे, संकेत साबळे, पार्थ मुळे व रत्नाकर जोशी आदी ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले.
यानंतर कोठी संस्थान मध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, मनोज थेटे, रुपाली भुतडा यांनी त्यांचा सत्कार करण्यात आला. तेथुन बाहेर पडतांना कोठी संस्थानच्या प्रवेशद्वारातच महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांनी कोठी हाॅलमधुन मंदिरात प्रवेश केला. यावेळी दोन्ही कृषिमंत्र्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. ना. माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय कृषीमंत्री ना.शिवराजसिंह चौहान यांना पुष्पहार घालुन स्वागत केले. काही वेळ एकमेकांशी संवाद करुन दोन्ही नेते बाहेर आले. त्र्यंबकेश्वर मंदीरासमोर भाजप सदस्यता अभियानाचा शुभारंभ दोन्ही मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते सुरेशतात्या गंगापुत्र यांनी त्यांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव, अॅड. श्रीकांत गायधनी, जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर, मा.नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, शहराध्यक्ष प्रशांत बागडे, सचिन शुक्ल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी ओमकार पवार ( आयएएस), तहसीलदार श्वेता संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.
अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे व सहकार्यांनी चोख बंदोबस्त लावला होता.
प्रतिनिधी:-रविंद्र धारणे,त्र्यंबकेश्वर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......













