नामदार कोकाटे यांच्या रूपाने कृषी मंत्री म्हणून सर्व सामान्य लाडक्या शेतकऱ्यांना न्याय मिळणारं …
प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर . दि, २२ डिसेंबर — हिवाळी अधिवेशनाच्या पुर्व संध्याला राज्यातील नवनिर्वाचित मंत्र्यांचा खातेवाटप जाहीर झाले असून सिन्नर चे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना राज्याचं ” कृषी मंत्री ” हे खाते मिळाले आहे. त्यामुळे बळीराजाला या क्षेत्रातील अनुभवी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याची भावना संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी व सिन्नर सह नाशिक जिल्ह्यातील सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
सिन्नर चे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने या माध्यमातून महाराष्ट्राला हेवा वाटावा असा विकास पुरूष ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखतो कामांच्या माध्यमातून दुर्लक्षित शेतकरी व शेतमजूर यांच्या गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा आपला माणूस आपल्या साठी,,, असा धडाडीने काम करणारे मंत्री सिन्नर तालुक्यातील सोमठाणे या छोट्याशा खेड्यात अवतरले.. आता खर्या अर्थाने राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नामदार कोकाटे यांच्या रूपाने कृषी मंत्री म्हणून सर्व सामान्य लाडक्या शेतकऱ्यांना न्याय मिळणारं …
आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपली राजकीय सुरुवात नाशिक जिल्हा युवा काँग्रेसच्या अध्यक्ष पासुन सुरु झालेला प्रवास अखेर राज्य च्या कृषी मंत्री पर्यंत येऊन पोहला तो जनतेशी प्रामाणिक राहून फक्त विविध प्रकारच्या विकास कामांच्या जोरावर.. सिन्नर तालुक्यातील सर्व सामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्राला राज्याचे कृषी मंत्री पदाचा मान मिळाला आहे, त्यामुळे तालुक्यासाठी खास अभिमान व हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा असेल तर श्री. कोकाटे यांचे मंत्रिपद राज्याला एका नवीन वळणावर घेऊन जाणाऱ्या कोकाटे यांचे सर्वाधिक कौतुक होत आहे हे मात्र नक्की..
प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर aonenewsmaharashtra@gmail.com

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






