best news portal development company in india

नाशिक महानगरपालिकेत प्रहार पुन्हा आक्रमक…..

SHARE:

प्रतिनिधी:-ज्ञानेश्वर सांगळे,नाशिक

 नाशिक शहरात खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पेठ फाटा येथे जन आक्रोश आंदोलन….

   नाशिक शहरात प्रहार स्टाईलने शहर प्रमुख श्याम भाऊ गोसावी यांच्या नेतृत्वात पेठ फाटा येथे दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. शहरात रस्त्यावर जागोजागी बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रचंड खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी तर खड्ड्यात माती टाकून खड्डे बुजवण्याचे प्रयत्न महानगरपालिकेद्वारे केला गेला आहे.

    या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यात निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे तसेच लोकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु नाशिक शहर बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रचंड मनस्ताप होत आहे. याला नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना जबाबदार धरले जात आहे. नागरिकांच्या मनस्तापाची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षा द्वारे पेठ फाटा येथे जन आक्रोश आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करावे. तसेच पुढील आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची विनंती केली आहे. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घेण्यात यावी. याप्रसंगी दत्तू बोडके, अनिल भडांगे, समाधान बागल, श्याम गोसावी, वैभव रोकडे, निवृत्ती धात्रक, शोभाताई काळे, कल्पेश शिंदे, ललित पवार, बाळासाहेब घुगे, पंकज बैरागी, कैलास चव्हाण, प्रमोद केदारे, शिल्पाताई झारेकर, जगदीश चौधरी, नामदेव जाधव,जोशना सोनार, तमसूम शेख, जब्बर शेख, श्याम पातडे, प्रेम अग्रवाल, सोमनाथ मल्ले ,ऋषिकेश गोडसे ,मनीषा पाटील, सुनील पाटील, अर्चना खराटे, माधव खराटे, आंदोलन प्रसंगी उपस्थित होते….

 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई