प्रतिनिधी:-ज्ञानेश्वर सांगळे,नाशिक
दिव्यांग सशक्तीकरण अभियानात मोफत उपकरणे नोंदणी शिबीर संपन्न…..
जागतिक दिव्यांग सप्ताहात दिव्यांगांना केंद्र सरकारचा मदतीचा हात….
जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांग सशक्तीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले, नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांगांंच्या सर्वांगीण विकासासाठी बनवण्यात आलेल्या मुंबई नाका येथील अटल दिव्यांग भवनात हा सोहळा विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला, या कार्यक्रमास प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत यांची प्रमुख उपस्थिती लाभली जिल्हाध्यक्ष रवींद्र टीळे यांनी दिव्यांगांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन या विषयी मार्गदर्शन केले, केंद्र सरकारच्या वतीने अलिम्को फाऊंडेशन या स्वायत्त संस्थेकडून मोफत साहित्य व उपकरणांची नाव नोंदणी करण्यात आली यात तिनचाकी बॅटरी सायकल, व्हीलचेअर, कॅलिपर्स, कुबड्या, कृत्रिम हात व पाय, अंध काठी, श्रवणयंत्र, आदी उपकरणे शासनाच्या वतीने मोफत देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टीळे यांनी सांगितले, या वेळी विशेष शाळेतील बालकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन समाजोपयोगी संदेश दिला, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्ता बोडके यांनी मनोगत व्यक्त केले तसेच दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर ही घेण्यात आले, या कार्यक्रमास शहरासह ग्रामीण भागातील दिव्यांगांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

या प्रसंगी राज्य महासचिव रामदास खोत, पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता बोडके उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पील्ले , उपाध्यक्ष अरुण जाधव जिल्हाध्यक्ष रवींद्र टीळे, संयुक्त जिल्हाध्यक्ष नरेंद्र खैरनार, संपर्क प्रमुख संतोष मानकर, कार्याध्यक्ष बबलु मिर्झा, उपजिल्हाध्यक्ष हिरामण मनोहर, अंबादास कळमकर, शरद नरवाडे जयवंत थेटे, निलेश क्षिरसागर, गणपत नाठे, सोमनाथ पेखळे, सपान परदेशी, सुनील वालझाडे, गोपाळ सामोरे, नंदकिशोर बैरागी, चंद्रकांत वालझाडे, नानासाहेब पवार, राजेंद्र गायकवाड, रामदास बोडके, गौरव भावसार, राहुल ढिकले, दिनेश स्वामी, दशरथ गबाले, दत्ता मांडे, दत्तात्रय रिकामे, मधुकर कसबे, त्र्यंबक कड, ललिता पवार, मनिषा स्वामी, तान्हु बाई खांडबहाले, सुशीला सांगळे, आशा नरवाडे, मनिषा सुर्यवंशी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी:-ज्ञानेश्वर सांगळे,नाशिक
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






