प्रतिनिधी सिन्नर :-
उमेदवारांनो लक्षात ठेवा कान भरणार्यांना लांब ठेवा !
—– ——
राष्ट्रवादी व भाजप च्या कार्यकर्त्यांची मनातील भावना सोशल मीडिया वर व्यक्त….
सिन्नर : विधानसभेच्या निवडणुकीत सिन्नर मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाचे (अजित पवार गट ) विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे विरुद्ध राष्ट्रवादी पक्षाचे ( शरदचंद्र पवार गट ) युवा नेतृत्व उदय सांगळे या प्रतिस्पर्धी मध्ये निवडणूकीचा बिगुल वाजला असुन बैठका व मेळावा सुरू झाले आहे असे असले तरी मतदार संघात मात्र सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.. कारण सत्ताधारी नेत्यांनी मोजक्या गावपुढार्यानां हाताशी धरून ते सांगतील ते योग्य असल्याचे नेत्यांच्या वागणुकीवरुन लक्षात येत आहे.. मुर्गी करी मेहनत.. अंडा खाई फकीर …… ! अशी भावना सोशल मीडिया व्यक्त होतांना दिसत आहे
सध्या विद्यमान आमदार हे हवेत आहे. ते जास्तच उंचीवर आहे. जमिनीवर या नाहीतर काय होते हे आपण २०१४ च्या निवडणूकीतील या तालुक्यातील जनतेने दाखवून दिले आहे. परंतु सत्ता मिळताच कोण तुम्ही ..? मला फार कामं आहे.. मला शुल्लक गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही. तु तर माझ्याच माणूस आहे.. तुझं काय असेल ते नंतर पाहू.. म्हणजे आपलं सोडून पळत्याच्या पाठीमागे धाऊन तुम्ही काय साध्य करणार. आशा अनेक गावांतील शेतकरी.तरुण . कष्टकरी कामगार. यांना गेल्या अनेक वर्षांपासून अनुभवले जनता यावेळी मात्र पुन्हा जागा दाखवून देणार आहे.अशी भावना सर्व स्तरातून होत आहे व्यक्त..
नेत्यांनो लक्षात ठेवा कान भरणार्यांना लांब ठेवा.. पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कदर करा..
सिन्नर मध्ये दुर्लक्षित कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी व्हाटस्आप वर पोस्ट टाकून शेअर करताना दिसत आहेत.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी तालुक्यातील एका मतदार असलेल्या एका व्यक्तीला भेटायला बोलावले परंतु काही कान गोष्टी झाल्यानं तु निवडणूक होवो पर्यंत मी तुला भेटु शकत नाही मला वेळ नाही.. एक सच्चा कार्यकर्ता म्हणून तुमच्या जवळ येतो आणि तुम्ही त्याला दुर करतात हे कसलं घाणेरडं राजकारण.. साहेब ऐवडी सत्तेची हवा डोक्यात आली कुठून व कोणामुळे हे विसरलात का असा सवाल उपस्थित केला आहे,

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





