best news portal development company in india

अजून किती पिढ्या बरबाद करणार , राळेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला समज दिली,जागे व्हा

SHARE:

   अजून किती पिढ्या बरबाद करणार ?

   प्रतिनिधी राळेगाव :-

         राळेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला मनसेचे अधिकृत उमेदवार श्री अशोक मारुती मेश्राम यांनी आपल्या भाषणातून जागृत व्हा, अजून आपण किती पिढ्या बरबाद करणार असे विधान केले, मला निवडून द्या मी तुमच्या मतदारसंघाचा विकास करण्यास बांधील राहील व 24 तास आपल्यासाठी सेवा देण्यास उभा राहील असे मतदारांना सांगितले मी आश्वासन देत नाही मी हे कृतीतून करून दाखवतो हे माझे 35 वर्षातील नोकरीतून अनुभवलेला आहे म्हणून मी त्या अनुभवातून करून दाखवणार आहे,,       अशोक मारुती मेश्राम सांगितले..

माणूस जन्माला आला की वीस वर्षात तरून होतो, वीस वर्षाची एक पिढी अशी दिड पिढी माजी आमदार आणि अर्धी पिडी आजी आमदाराने बरबाद केली,आणि अजूनही आमच्या पिढ्या बरबाद करण्याची आजी माजी आमदाराची तयारी चाललेली आहे, धुमधडाक्यात आमच्या पैशावर ही मंडळी आम्हालाच बरबाद करण्याच्या प्रयत्नात आहे ,आमच्याच पैशाचे क्षणिक आमिष दाखवून आम्हाला बरबाद करण्याचा त्यांचा प्रयत्न ,डाव ते खेळत आहे मतदारांनो तुम्ही हे केव्हा समजून घेणार? तुमच्या अनेक पिढ्या बरबाद करणारे हे आजी माजी काय यांनाच निवडून देणार ?आणि येणारी पुढची पिढी सुद्धा बरबाद करणार काय? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि मतदानाचा निर्णय घ्या. “मी एक जबाबदार कर्तव्यनिष्ठ, जाहीर व्यासपीठावर तुम्हाला बोलावून तुमच्या मनातल्या संकल्पना काय त्या मला कळवा , मी तुमच्या संकल्पनेनुसार काम करण्याच अभिवचन देतो, मला तुम्ही साथ द्या तुमची येणारी पिढी ही तुम्हाला आणि मला दोघांनाही आशीर्वाद देईल आता तरी शांत बुद्धीने विचार करा आणि बदल करा “वालवान तुमच्या विकासाच स्वप्न साकार करण्याचा माझा निर्धार आहे एकदा मला संधी देऊन माय बाप हो आपल्या पिढ्या वाचवून घ्या ही पोट तिडकी ची माझी विनंती तुम्ही विचारात घ्या आणि माझ्या इंजिनला गती देऊन तुमची प्रगती साधा.ही संधी सोडू नाका संधीचे सोने करून घ्या…..

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई