best news portal development company in india

राळेगाव विधानसभा मतदारसंघात जनसेवा आणि विकास हेच ध्येय.

SHARE:

   राळेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कंबर कसून तयारीला

अशोक मारुती मेश्राम 

प्रतिनिधी राळेगाव:-

राळेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत असताना अशोक मारुती मेश्राम राळेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावाचा दौरा करत आहे, आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, मागील काही वर्षातमध्ये या मतदारसंघांमध्ये कुठलाही प्रकारचा विकास दिसून येत नाही,  गावा गावातील नागरिकांच्या अनेक मूलभूत गरजा अजूनही पूर्ण होत नसल्याचे चित्र या मतदारसंघात दिसत आहे असे अशोक मारुती मेश्राम यांनी म्हटले आहे,मजुरांच्या हाताला काम नाही,शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी शेतीवर केलेला खर्च सुद्धा निघणार नसल्याचे चित्र दिसते आहे, गावा गवात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे पिण्याचे शुद्ध पाणी नाही, गावागावात तरुणांच्या हाताला काम नाही, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण हतबल झाल्यासारखे दिसत आहे. त्यांच्या जीवनामध्ये नैराश्य पसरल्याचे दिसून येत आहे ,हा सर्व भाग या मतदारसंघातील मागील जनप्रतिनिधींनी या मतदारसंघातील लोकांसोबत केलेल्या बेइमानीमुळे झाला आहे, मागील तीस वर्षापासून या मतदारसंघाकडे विकासाच्या दृष्टीने डोळेझाक करण्यात आलेली आहे त्यामुळे या मतदारसंघातील लोकांचे जीवन अत्यंत हलाखीचे झालेले आहे, या परिस्थितीमध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी मी 24 तास या मतदारसंघाचा अभ्यास करीत आहे , या मतदारसंघातील लोकांचे जीवन उन्नत कसे होईल त्या दृष्टिकोनातून माझे नियोजन सुरू आहे असे अशोक मारुती मेश्राम यांनी सांगितले

 मी जर या मतदारसंघातून निवडून आलो तर या मतदारसंघातील सर्व समाज घटकासाठी मग तो शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुण,तरुणी विद्यार्थी,छोटे, मोठे व्यवसायिक/व्यापारी असो सर्वांसाठी विकास उपक्रम माझ्याकडे उपलब्ध आहे, शासनाचे अनेक विकास निधी आहे तो विकास निधी या मतदारसंघाच्या लोकांसाठी शंभर टक्के खर्च करण्याची माझी तयारी आहे, शासनाचे असे अनेक उपक्रम आहे जे नियोजन बद्ध पद्धतीनं मतदारसंघात राबविले तर मतदारसंघ बारामती सारखा झाल्याशिवाय राहणार नाही याकरिता सच्चा दिलाने काम करणाऱ्या उमेदवाराची गरज म्हणून मी या मतदारसंघांमध्ये लोकांचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे, मी या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असे अशोक मारुती मेश्राम यांनी सांगितले आपण मला सहकार्य करून उपकृत करा हीच नम्र विनंती.

जय सेवा …….

 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई