best news portal development company in india

धनगर समाजाकडून अनु.जमाती आरक्षण अंमलबजावणी करीता नाशिक रोड येथे रस्ता रोको

SHARE:

सकल धनगर समाजाकडून अनु.जमाती आरक्षण अंमलबजावणी करीता नाशिक रोड येथे रस्ता रोको.

प्रतिनिधी नाशिक
सोमवार दिनांक २३सप्टेंबर रोजी दत्त मंदिर,नाशिक पुणे महामार्गावर सकल धनगर समाजाने अनु.जमाती आरक्षण अंमलबजावणी करीता भव्य असे रस्ता रोको आंदोलन केले.यामुळे पूणे मार्गावरील वाहतूक बऱ्याच कालावधी करीता विस्कळित झाली होती.
धनगर समाज प्रतिनिधी श्री.समाधान बागल यांच्या सोबत ‌चर्चा केली असतांना धनगर समाज हा मुळातच आदिवासी यादी मध्ये ३६ क्रमांकावर असून फक्त उच्चारणात व लिहिण्यात बरोडाचे बडोदा व्हावे असे धनगरांचे धनगड झाले आहे.शासनाला ही चुक दुरुस्ती करून फक्त आदेश काढायचा आहे.
सदर आरक्षण अंमलबजावणी मुळे मुळ आदिवासी आरक्षणावर कुठलाही परीणाम होणार नसल्याचे धनगर समाजाचे म्हणने आहे . नासिक पुणे राष्ट्रीय महामार्ग एक तास रोखून धरून वाहतूक विस्कळीत झाली.याप्रसंगी महसूल विभाग पोलीस अधिकारी पोलीस फाटा तैनात होता. याप्रसंगी सामाजिकक्षेत्रातील श्री समाधान बागल, श्री विनायक काळदाते, ज्ञानेश्वर ढेपले, श्री नवनाथ ढगे, सदाशिव वाघ साहेब, किशोर वाघ, नितीन धाना पुणे राजाभाऊ पोथरे, सोमनाथ गायकवाड,कल्पेश शिंदे वैभव रोकडे, अण्णा साहेब सापणार देवराम रोकडे, राजाभाऊ बादाड, भूषण जाधव, भाऊलाल तांबडे खंडेराव पाटील बापूसाहेब शिंदे,,रामेश्वर खानपाटे,
सदर आंदोलनात ‌असंख्य धनगर समाज बांधव सामील झाले होते .

 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई