कोलकाता: 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी आरजी कर मेडिकल कॉलेजमधील चेस्ट डिपार्टमेंटमधील प्रथम वर्षाच्या पीजीटी महिला डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह सापडला होता. यानंतर ताला पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी पहिली जनरल डायरी (जीडीई 542) नोंदवण्यात आली. दुपारी 3 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास, हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक आणि उपप्राचार्यांनी (एमएसव्हीपी) ताला पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बंद लिफाफ्यात एक गोपनीय पत्र दिलं होतं. मृतदेह सापडल्याबाबत एफआयआर नोंदवण्याची विनंती त्या पत्रात करण्यात आली होती. संध्याकाळपर्यंत कोलकाता पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून 40 वस्तू जप्त केल्या. यानंतर, रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी पीडितेच्या पालकांनी बलात्कार आणि हत्येची कलमे जोडून एफआयआर दाखल केला.
कोलकाता पोलिसांनी नोंदवलेल्या टाइमलाइननुसार, जवळच्या ताला पोलीस स्टेशनमधील अधिकार्यांचे दोन गट सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी आणि 10 वाजून 30 मिनिटांनी घटनास्थळी गेले होते. त्यांनी घटनास्थळ सील केलं. अतिरिक्त आयुक्त दर्जाचे अधिकारी आणि सहपोलीस आयुक्त दर्जाचे काही अधिकारी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, तपास विभागातील अधिकारी, फॉरेन्सिक टीम, फूटप्रिंट आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ, एक फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर सकाळी 11 ते साडेअकराच्या दरम्यान घटनास्थळी आले होते. सहाय्यक अधीक्षकांनी सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनी मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचण्यास सांगितले. दुपारी साडेबारा वाजता पोलीस आयुक्त स्वतः घटनास्थळी आले.
बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोणत्या देशात काय शिक्षा? तुम्हाला माहितीय का?
ड्युटीवर असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याने (ईएमओ) महिला डॉक्टरला दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी मृत घोषित केलं. यानंतर लगेचच स्टेट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचं (एफएसएल) पथक तपासासाठी घटनास्थळी आलं. प्रक्रियात्मक विलंब आणि पीडितेच्या कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता, संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटे ते 7 वाजून 10 मिनिटे या वेळेत पोस्टमॉर्टेमचं डॉक्युमेंटेशन करण्यात आलं.
Explainer: POCSO कायद्यात नवीन बदल, बदलापूरच्या नराधमाला होऊ शकते फाशी?
नोंदीनुसार, तपास आणि पोस्टमॉर्टेम सुरू असताना, तपासकर्त्यांनी गुन्ह्याच्या ठिकाणच्या सर्व एंट्री आणि एक्झिट पॉईंट्स आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली होती. प्रकरणाच्या तपशीलासाठी, त्या रात्री ड्युटीवर असलेल्या पीडितेच्या चार डॉक्टर सहकाऱ्यांसह अकरा जणांची चौकशी करण्यात आली. रात्री 8:30 ते 10:45 च्या दरम्यान, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी व्हिडिओग्राफी अंतर्गत गुन्ह्याच्या ठिकाणाहून 40 वस्तू जप्त केल्या. पोस्टमॉर्टेमनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





